ओस्लो : मागील १०० वर्षांपासून नॉर्वेतील एका शहराच्या नागरिकांनी सूर्यप्रकाश पाहिलेला नव्हता. सूर्यकिरणे या ठिकाणी हिवाळ्यात पर्वतांनी घेरल्यामुळे पोहोचू शकत नव्हती. यासाठी शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सनी अनोख्या पध्दतीने शहरासाठी काचेच्या मदतीने नव्या सूर्याची निर्मिती केली आहे.
काचेच्या सूर्याची शास्त्रज्ञांकडून निर्मिती
वास्तविक नॉर्वेतील जुकान नावाचे शहर पर्वतांच्या मधोमध आहे. आसपासच्या पर्वतांनी हे शहर झाकलेले असते. या समस्याबाबत इंजिनिअर्संनी सुचवलेल्या उपायावर येथील व्यवस्थापकांनी असे काच लावले ज्यांच्या मदतीने सूर्यकिरणे लोकांपर्यंत जातील. काचा पर्वतावर लावली गेली आहेत. पर्वत स्वत: एका सूर्याप्रमाणे दिसतो. यामुळे दररोज दिवसा लोक येथे प्रचंड गर्दी करत असतात. यात काही सौरऊर्जा पॅनेल्सही लावली गेली आहेत. ती संगणकाशी जोडलेली आहेत. यामुळे काचा दररोज आपोआप स्वच्छ होतात आणि धुतलीही जातात. सूर्याच्या स्थितीनुसार काचा फिरवली जातात. याने शहरातील प्रत्येक भागात सूर्यप्रकाश पोहोचतो.