नवी दिल्ली : लहानपासून आपण आजोबा-आजी आणि त्यानंतर टीव्हीवर पाहिले आहे आणि ऐकले देखील आहे. जर तुम्ही रामायण ऐकले किंवा पाहिले असेल तर त्यातील तुम्हाला रामभक्त जटायू नक्कीच आठवत असेल. जटायूने सीता मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता रावणाशी दोन हात केले आणि त्यात त्याला मरण आले होते.
आता रामभक्त जटायूचे होणार दर्शन !
लवकरच आता जानेवारीमध्ये केरळच्या कोल्लम येथे जटायू नेचर पार्क सुरु करण्यात येणार आहे. केरळच्या टूरिझम मॅपमध्ये या नेचर पार्कमुळे आणखी एक नव्या पर्यटन स्थळांची भर पडेल. जटायू नेचर पार्क कोल्लम जिल्ह्याच्या चदयामंगलम गावांत बनवण्यात आले असून हे सर्वांसाठी जानेवारी २०१६मध्ये खुले करण्यात येणार आहे.
याबाबत एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जटायूचे मोठे शिल्प या पार्कमध्ये बनवण्यात आले आहे. जटायू आणि रावण यांच्यात ज्या ठिकाणी सीता अपहरणाच्या वेळेस लढाई झाली त्या ठिकाणी हे शिल्प बनवण्यात आले आहे आणि हे शिल्प जगातील सर्वात मोठे शिल्प असल्याचे बोलले जात आहे. २०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि ७० फूट उंच असे हे शिल्प आहे. तब्बल सात वर्षे हे बनवण्यासाठी लागली. केरळ सरकारने या नेचरपार्कसाठी १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या पार्कात जटायूराजचे दर्शन तुम्ही जानेवारी २०१६ मध्ये घेऊ शकता.