हाताने मजकूर लिहिलेल्या नोटा चलनात राहणार

note
मुंबई – सोशल मिडीया व्हॉटस अॅपवर सध्या झळकत असलेल्या मजकुरासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ऑडिओ मेसेज जारी केला आहे. सोशल मिडीयावर सध्या अशी अफवा आहे की या वर्षअखेर ज्या नोटांवर हाताने काही मजकूर लिहिला आहे त्या अवैध मानून चलनातून बाद करण्यात येणार आहेत. मात्र ही अफवा आहे आणि या नोटा चलनातून जाणार नाहीत असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

ज्या नोटांवर हाताने काही मजकूर लिहिला गेला आहे त्या वैध नोटा आहेत. त्या खराब नोटा म्हणून गणल्या जातील मात्र खरेदी विक्री करताना त्या वापरता येणार आहेत. राजन म्हणतात अशा नोटा बाद करण्यासंदर्भातले कोणतेच पत्रक आम्ही काढलेले नाही. सर्व चलनी नोटा वैध आहेत. मात्र स्वच्छ नोटा पोलिसी अंतर्गत नोटांवर मजकूर लिहू नये असे आवाहन केले जात आहे. कारण यामुळे नोटा खराब होतात व त्यांचे आयुष्यही कमी होते.

Leave a Comment