सिंगापूरच्या ६ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

isro
चेन्नई – सिंगापूरचे ६ उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशात पाठवले असून हे उपग्रह अवकाशात पीएसएलव्हीच्या माध्यमातून सोडले. हे उपग्रह संध्याकाळी ६ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेपण स्थळावरुन अवकाशात झेपावले.

इस्रोच्या माध्यमातून सुरु झालेल्या या पीएसएलव्ही-सी२९ टेलेओस-१ मोहिमेची उलटगणती सकाळी ७ वाजल्यापासून सुरू असल्याची माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. उपग्रहांमध्ये टेलेओस-१ हा प्रमुख उपग्रह ४०० किलो वजनाचा असून इतर पाच उपग्रहांमध्ये २ सूक्ष्म उपग्रह आणि तीन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे.

Leave a Comment