पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीनंतर करवाढीचा बोजा

petrol
नवी दिल्ली: एकीकडे कच्च्या तेल्याचे भाव आतंरराष्ट्रीय बाजारात घसरलेले असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात (एक्ससाइज ड्यूटी) वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पेट्रोलवर प्रति लीटर ३० पैसे तर डिझेलवर १.१७ रु. प्रति लीटर एक्ससाइज ड्युटी सरकारने वाढविली आहे. पेट्रोलवरील एक्ससाईज ड्युटी ३० पैसे वाढविल्याने आता पेट्रोलवरील एकूण एक्ससाइज ७.३६ रु. प्रति लीटर झाली आहे. तर डिझेलवरील एकूण एक्ससाईज ड्यूटी ५.८३ रु. प्रति लीटर झाली आहे. सरकारी तिजोरीत या निर्णयानंतर २५०० कोटींची भर होणार असल्यामुळे या वर्षाच्या आर्थिक वर्षाचे बजेटचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment