दुबईच्या बुर्ज खलिफाची काही अज्ञात वैशिष्ट्ये

burj-khalifa
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वाधिक उंचीची इमारत असल्याचे आपल्याला माहिती आहेच. आकर्षक डिझाईन, प्रचंड उंची असलेल्याआणि दुबईचा नयनमनोहर नजारा दाखविणार्‍या या इमारतीबद्दल सतत कांही ना कांही छापूनही येत असते. मुळात या इमारतीची उभारणीच दुबईला जागतिक प्रसिद्धी देण्यासाठी केली गेली आहे. अर्थात या इमारतीबाबतही कांही वादविवाद आहेत. या इमारतीसंदर्भातल्या कांही गोष्टी कदाचित तुम्हाला माहितीही नसतील. म्हणून ही माहिती.2004 साली बांधकाम सुरू झालेली ही इमारत 2010 साली पूर्ण झाली.

burj-khalifa1
1) सर्वात उंच इमारत- जगातील ही सर्वाधिक उंचीची इमारत आहे. वास्तूरचनाकारांच्या आराखड्यानुसार तिची उंची 2716.5 फूट आहे. म्हणजे 828 मीटर्स. मात्र माथ्यापासून पायापर्यंत तिची उंची भरते 2723 फूट. जगातील दोन नंबरची उंच इमारत आहे शांघाय टॉवर्स. तिची उंची आहे 2073 फूट. म्हणजे या पहिल्या दोन इमारतींच्या उंचीतला फरकही जाणवण्याइतका म्हणजे सुमारे 700 फुटांचा म्हणजेच 70 मजले इतका आहे. तसेच ही इमारत आयफेल टॉवरपेक्षा तिप्पट उंच आहे.

burj-khalifa2
2)अंतर्गत रूप – या इमारतीचा अंतर्भाग अनोखा आहेच. कारण येथील ऑब्झर्वेटरी डेक 1483 फूटांवर आहे. हाही एक जागतिक विक्रम आहे. इमारतीला 58 वेगवान लिफ्ट असून त्यांचा वेग सेकंदाला 10 मीटर इतका आहे. हा वेगही जगातील कोणत्याही लिफ्ट पेक्षा सर्वाधिक आहे. येथे 2957 पार्किंग स्पेस, 304 हॉटेल्स, 904 अपार्टमेंटस, हेलिपॅड छतावर खेळाचे मैदान आहे. आग अथवा अन्य संकटात बाहेर पडण्यासाठी येथे वेगळे मार्गही आहेत.

burj-khalifa3
3)डिझाईन- ही इमारत दुबईत असली तरी तिचे डिझाईन अमेरिकन फर्म स्कीडमोअर च्या ओविंंग मेरील या अभियंत्याने केले आहे. या इमारतीचे पूर्वीचे नाव बूर्ज दुबई असे होते मात्र नंतर ते बदलून बुर्ज खलिफा असे केले गेले. अबुधाबीचे शासक व यूएईचे अध्यक्ष खलिफा मिन झायेद अल नह्यान यांच्या सन्मानार्थ हा मावबदल करण्यात आला. ही इमारत बांधताना आता बट्रेट कोअर या नावाने ओळखल्या जात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला 160 मजल्यांपर्यंत सपोर्ट देणारी ही बांधकाम पद्धती आहे. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम मात्र कोरियाच्या सॅमसंग इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनीने केले.

4)अनेक रेकॉर्डस- या इमारतीच्या नांवे अनेक रेकॉर्ड नोंदली गेली आहेत. ही टॉलेस्ट फ्री स्टॅडिंग इमारत आहेच पण त्यात वरच्या मजल्यांवर अधिक ऑक्युपन्सी आहे. या इमारतीत लिफ्टपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्गही मोठ्या अंतराचे आहेत आणि येथेील सर्व्हीस लिफ्टही सर्वाधिक उंचावर जाणारी लिफ्ट आहे.

5)कामाला लागलेला वेळ- ही इमारत 6 वर्षात बांधून पूर्ण केली गेली व त्यासाठी 2 कोटी 20 लाख मॅन अवर्स लागले. येथे दररोज 12 हजार कामगार पूर्णवेळ कामावर होते.

6)बांधकाम साहित्य- इतकी मोठी इमारत उभी करायची तर त्यासाठी बांधकाम साहित्यही खूपच लागणार. या बांधकाम साहित्याचे वजनही तितकेच भारी असणार. या इमारतीसाठी अ‍ॅल्युमिनियमचा वापर खूप केला गेला आह. पण त्यासाठी पाच ए380 एअरबस या महाकाय विमानांच वजनाइतके अ‍ॅल्युमिनियम वापरले गेले आहे. 55 हजार टन स्टील, 11 हजार टन काँक्रिटचाही वापर केला गेला आहे. या काँक्रीटचे वजन 1 लाख हत्तींच्या वजनाइतके होते. या बांधकाम साहित्याची सरळ रेषेत मांडणी केली तर पृथ्वीच्या 1/4 भागाइतकी ती होते.

7) तापमान कंट्रोल- दुबईतील तापमान नेहमीच गरम असतेच पण येथील उन्हाळा महाभयंकर असतो. त्यावेळी येथील तापमान 106 डिग्रीच्या वरही जाते. त्यामुळे इमारत बांधताना या तापमानाला तोंड देऊ शकेल अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य होते. त्यासाठी 300 चिनी तज्ञ बोलावले गेले होते व त्यानीं क्लॅडिंग( म्हणजे एका पदार्थावर दुसर्‍या पदार्थाचा लेप) पद्धतीने हे काम केले. आपण वॉटरप्रूफिंगसाठीही हीच पद्धत वापरत असतो ती अन्य हवामानासाठीही वापरता येते.

8) किती वीज आणि किती पाणी- या इमारतीत दररोज 2 लाख 50 हजार गॅलन पाणी वापरले जाते आणि वीजेचा वापरही प्रचंड आहे. 100 वॉटचे 3 लाख 60हजार बल्ब वापरण्यासाठी जितकी वीज लागेल तेवढी वीज येथे रोज वापरली जाते.

9)स्वच्छता- जागतिक कीर्तीच्या या अवाढव्य इमारतीची स्वच्छता हेही मोठेच काम आहे. या इमारतीला बाहेरून 26 हजार ग्लांस पॅनल बसविली गेली आहेत आणि ती रोज स्वच्छ केली जातात. त्यासाठी इमारतीच्या बाहेरून ट्रॅक बांधला गेला आहे. त्यावरून 13 टनी वजनाची 12 मशीन्स हे काम 36 लोकांच्या मदतीने पार पाडतात.

10) डिझाईनची कल्पना – या इमारतीच्या डिझाईनची कल्पना लांब पाकळ्यांच्या हायमेनॉकालिस या फुलावरून सुचली आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ ब्युटीफूल मेमब्रेन असा आहे. मध्यापासून निघालेल्या लांब लांब पाकळ्यांचे फूल. बुर्ज खलिफाचे विंगही याचप्रकारे सेंट्रल पॉईंटपासून निघालेले आहेत.

Leave a Comment