जनरल मोटर्स एक लाखाहून अधिक कार पुन्हा बोलविणार

general-motors
नवी दिल्ली – एक लाखाहून अधिक बीट डिझेल कार परत बोलावण्याचा निर्णय जनरल मोटर्स इंडियाने घेतला आहे. डिसेंबर २०१० ते जुलै २०१४ दरम्यान या कारची निर्मिती करण्यात आली होती. कंपनीला या कारच्या क्लच-पेडल-लीव्हरमध्ये चुका असल्याचे आढळले आहे. यापूर्वी कंपनीने २०१३ मध्ये इमिशनशी संबंधित चुका आढळल्याने १.१४ लाख शेवरले तवेरा गाडय़ा परत बोलाविल्या होत्या. तसेच गुरुवारी होंडा कार्स इंडिया लिमिटेडने फ्युएल रिटर्न पाइपमध्ये गडबड आढळल्याने ९० हजार कार परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता,

देशभरामध्ये विक्री करण्यात आलेल्या १ लाखाहून अधिक बीट कार परत बोलविण्यात येणार आहेत. या कारच्या क्लच-पेडल-लीव्हरमध्ये गडबडी आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. काही चुका आढळल्यास त्या मोफत सुधारण्यात येणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. देशभरातील २४८ अधिकृत सेवा केंद्रातून या कार परत बोलवण्यात येणार आहेत. गुणवत्ता आणि सेवेला आपली प्राथमिकता आहे. बीट कार ग्राहक आपली कार नजीकच्या सेवा केंद्रामध्ये तपासणीसाठी नेऊ शकतात. ग्राहकांना मोफत सेवा देण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

Leave a Comment