केंद्र सरकार देणार आठ सार्वजनिक बँकांना पाच हजार कोटीची मदत

bank
नवी दिल्ली – केंद्र सरकार २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील आठ बँकांना पाच हजार कोटीची मदत देणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये या बँकांनी सुधारणा करण्याच्या अटीवर सरकार ही आर्थिक मदत देणार आहे. त्या बँकांमधील विजया बँक, सिंडिकेट बँक, इंडियन बँक या प्रमुख बँका असल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये सरकारी बँकांनी सुधारणा आणावी आणि चांगल्या प्रमाणात नफा कमावल्यानंतर ही मदत देणार येण्यात असल्याचे अर्थ मंत्रालयातील एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले.

केंद्र सरकारने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या नऊ महिन्यामध्ये ८ बँकांनी केलेल्या कार्यक्षमतेनुसार ही पाच हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Leave a Comment