जगातले दहा दानशूर अब्जाधीश

[nextpage title=”जगातले दहा दानशूर अब्जाधीश”]
collarge
ज्यांच्याकडे अगणित संपत्ती आहे त्यांचे जीवन कसे मस्त असेल असे वाटणे साहजिक आहे. पैशाने काहीही मिळू शकते असा समज असल्याने सर्वसाधारण पणे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे पाहण्याची सामान्यंाची दृष्टी थोडी असूयेची असते. अनेकांना प्रचंड कष्ट केल्यानंतर पैसा मिळतो तर कांही जणांना तो वाडवडिलांच्या संपत्तीतून आपोआपच मिळतो. मात्र विद्या जशी विनयाने शोभते तसेच श्रीमंतीही दानशूरतेने अधिक ठळकपणे सामोरी येते. आज जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींना याची जाणीव आहे व त्यामुळेच आपल्या संपत्तीतला कांही भाग ते लोकोपयोगी समाजोपयोगी कामांसाठी आवर्जून देत असतात.

जगातील तीन नंबरची श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या वॉरन बफेट यांनी पुढाकार घेऊन बिल व मिलींडा गेटस फौंडेशनच्या सहाय्याने गिव्हिग प्लेज हे कँपेन सुरू करून अब्जाधीशांनी त्यांची किमान अर्धी संपत्ती दान करावी असे आवाहन केले आहे आणि आजच्या तारखेपर्यंत या मोहिमेत ११२ अब्जाधीश सामील झाले आहेत. त्यातील बारा बड्या दानशूरांची ही माहिती [nextpage title=”१)रोनाल्ड पेरलमन”]
1-Ronald-Perelman
व्यवसायाने गुंतवणूकदार असलेल्या पेरलमन यांची संपत्ती आहे १४ अब्ज डॉलर्स. मॅक अँड्रूज व फोर्ब्स होल्डिंग इंक या कंपन्यांबरोबरच ते न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध कॉन्सर्ट व्हेन्यू कार्नेज हॉलचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांची संपत्ती शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रासाठी दान करण्याची प्रतिज्ञा केली असून गेली २० वर्षे ते ब्रेस्ट कॅन्सर व त्यावरील संशोधन व उपचारांसाठी पैसे देत आहेत.[nextpage title=”२)लॅरी एलिसन”]
2-Larry-Ellison
ओरॅकल कार्परेशन या तंत्रक्षेत्रातील नामवंत कंपनीचे हे मालक. जगप्रसिद्ध जावा प्रोग्रॅमचे डेव्हलपर.ही भाषा जभगरात इलेक्ट्राॅनिक्ससाठीही वापरली जात आहे. ५१ अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक असलेल्या एलिसन यांनी गिव्हींग प्लेजमध्ये ९५ टक्के संपत्ती चॅरिटीसाठी दान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर वॉरेन बफेट यांनी त्यांना वैयक्तिक पत्र लिहून तुम्ही जगासमोर फारच चांगला आदर्श ठेवला असल्याचे व त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असे कळविले आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा वापर शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.[nextpage title=”३)पॉल अॅलन”]
3-Paul-Allen
मायक्रोसॉफटचे सहसंस्थापक असलेले पॉल अॅलन बिल गेटस इतके प्रसिद्ध नाहीत. मात्र चॅरिटी करण्यासंदर्भात ते बिलच्या तोडीस तोड आहेत. द पॉल जी अॅलन फॅमिली फौंडेशन नावाची त्यांची चॅरिटी संस्था असन ते या माध्यमातून मेंदूच्या संशोधनासाठी भरीव मदत करत आहेत. सध्या इबोलाच्या संशोधनासाठीही त्यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. अॅलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स या पॅसिफीक नॉर्थवेस्ट भागात मेंदूवरील संशेाधन केले जात आहे.[nextpage title=”४) टेन टर्नर”]
4-Ted-Turner
केबल न्यूज नेटवर्क संस्थेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या अब्जाधीशाने युनायटेड नेशन्स फौंडेशनची स्थापना करून त्यांना १ अब्ज डॉलर्स दान दिले आहे. त्यामुळे या फौंडेशनला आता अन्य मार्गाने देणग्या मिळविण्यांचा मार्गही खुला झाला आहे. ते म्हणतात जगापुढचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझी संपत्ती आणि उर्जा देऊ इच्छीतो. त्यात अणुधोका, हवामान बदल व लोकसंख्या वाढ या जगाला धोकादायक ठरणार्‍या प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश आहे.[nextpage title=”५) अझीझ प्रेमजी”]
5-azim-premji
भारतीय आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीझ प्रेमजी २००१ मध्येच अझीझ प्रेमजी फौंडेशनची स्थापना केली असून सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अर्थात भारतातील शिक्षण क्षेत्रासाठीच ते प्रयत्नशील आहेत. ते गिव्हींज प्लेजमध्ये म्हणतात, आमच्यापैकी ज्यांच्याकडे संपत्ती आहे ती त्यांनी जगाच्या कल्याणासाठी दान द्यावी. चांगले जग निर्माण करण्यासाठीच्या या प्रयत्नात सर्वांचे योगदान हवे ज्यामुळे कमी भाग्यवान असलेल्या लक्षावधींचे कल्याण करता येईल.[nextpage title=”६)जेफ स्कोल”]
6-jeff-sokll
ईबे या ऑक्शन साईटचा पहिला अध्यक्ष असलेल्या जेफ स्कोल यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांनी १९९९ मध्ये स्कोल फौंडेशनची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यांसाठी मदत दिली जात आहे. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना व्यवसायात जम बसविता यावा यासाठीही सहाय्य केले जाते.२००९ साली त्यांनी स्कोल ग्लोबल थ्रेट फंड स्थापन केला आहे. त्यातून मानव जातीला थ्रेट म्हणजे धोका निर्माण करणारे हवामानबदल, अशांतता, अण्वस्त्रे यासारख्या धोक्यांसाठी अर्धी संपत्ती दान करणार असल्याची घोषणा केली आहे.[nextpage title=”७)डेव्हीड रॉकफेलर”]
7-david-rockfaller
सुप्रसिद्ध बँकर अशी ओळख असलेले डेव्हीड रॉकफेलर हे गिव्हींग प्लेजचे सदस्य आहेत. चेस मॅनहटन कार्पोरेशनचे अनेक वर्षे सीईओ असलेल्या रॉकफेलर यांनी अर्धी संपत्ती गरीबी निर्मूलन, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रांसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.[nextpage title=”८)जॉर्ज लुकास”]
8-George-Lucas
स्टार वॉर मुव्हीज व सिरीजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले लुकास सार्वजनिक कार्यक्रमातून फार क्वचित दर्शन देतात. मात्र एज्युटोपिया या संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी कार्यरत आहेत. तेही प्लेजचे सदस्य असून त्यांनी जॉर्ज लुकास एज्युकेशन फौंडेशनच्या माध्यमातून नवीन पिढीच्या शिक्षणासाठी मोठे दान उपलब्ध करून दिले आहे. पुढील पिढीला यश हवे असेल तर त्यासाठी योग्य शिक्षण हवे असे त्यांचे म्हणणे आहे.[nextpage title=”९)मायकेल बुमबर्ग”]
9-Michael--Bloomberg
न्यूयार्कचे माजी लोकप्रिय मेअर म्हणून ओळखले जाणारे बुमबर्ग दीर्घकाळ चॅरिटी करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. प्लेजमध्ये ते म्हणतात, प्रचंड संपत्ती आपण खर्चही करू शकत नाही आणि बरोबरही नेऊ शकत नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे त्या संपत्तीतला मोठा हिस्सा मी माझ्या आवडीच्या व मदतीची गरज असलेल्या क्षेत्रांना दान देत आहे. त्यासाठी ब्लूमबर्ग फिलाँथ्राफीची स्थापना केली गेली आहे व त्यातून कला, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व सरकारी इनोव्हेशन कार्यक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.[nextpage title=”१०)मार्क झुकेरबर्ग”]
10-mark-zuckerburg
फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग गिव्हींग प्लेजच्या यादीत तसा नव्यानेच सामील झाला असून या यादीतील तो तरूण अब्जाधीश उद्योजक आहे. त्यानेही त्याची संपत्ती चॅरीटीसाठी देण्याचा संकल्प केला असून त्याच्या मॅक्झिमा या मुलीच्या जन्मानंतर त्याने त्याच्या वाट्याचे फेसबुक शेअर ९९ टक्के दान देणांर असल्याचे जाहीर केले आहे. आज या शेअर्सची किंमत ४५ अब्ज डॉलर्स आहे.[nextpage title=”११)बिल गेटस”]
11-bill-gates
सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजे बादशाह अशी यांची ओळख. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी निवृत्तीनंतर बिल व मेलिंदा गेटस फौंडेशनची स्थापना करून जगभरातील अनेक देशांना शिक्षण, गरीबी निर्मूलन, आरोग्य यासाठी सढळ मदत केली आहे. जगभरातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे व जेथे आरोग्य, वैद्यकीय सेवा नाहीत अथवा तोकड्या आहेत तेथे त्या उपलब्ध करून देणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गरीबी हाच जगाचा भयंकर रोग असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांना वाटते.२०१४ साली जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद घेतली गेली आहे.[nextpage title=”१२)वॉरेन बफेट”]
12-Warren-Buffett
जगमान्य गुंतवणूकदार अशी ओळख निर्माण केलेल्या वॉरेन बफेट यांनीच गिव्हींग प्लेज संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी जून २००६ मध्येच त्यांच्या संपत्तीतील ८३ टक्के हिस्सा बिल व मेलिंडा गेटस फौंडेशनला दिला असून एकाच व्यक्तीने दिलेली डोनेशनची ही सर्वात मोठी रक्कम आहे. ६३ अब्ज डॉलर्स मालमत्ता असलेले वॉरेन जगातील ३ नंबरची श्रीमंत व्यक्ती आहेत.

Leave a Comment