‘एनर्जिका मोटार’ची ‘इवा’ गिअरबॉक्स शिवाय धावणार ताशी २०० किलोमीटर

eva
रोम : गिअरबॉक्स शिवाय ताशी २०० किलोमीटरचा वेग धारण करण्याची क्षमता असलेली ‘इवा’ ही नवी इलेक्ट्रॉनिक मोटारबाईक इटली येथील ‘एनर्जिका मोटार’ कंपनीने तयार केली असून लवकरच ही बाईक बाजारात दाखल होणार आहे.

‘विंन्टेज’ नावाची ई-बाईक यापूर्वी बाजारात दाखल झाली होती. एकदा चार्ज केल्यानंतर ३५ किलोमीटरपर्यंत धावणा-या या बाईकमध्ये २० टक्के जादा टॉर्क जनरेट करण्याची क्षमता होती. आता इटलीच्या ‘एनर्जिका मोटार’ कंपनीने या कन्मसेप्टला पुढे नेणारी नवी इलेक्ट्रॉनिक मोटार बाईक तयार केली आहे. गिअरबॉक्स शिवाय ताशी २०० किलोमीटरचा वेग धारण करण्याची क्षमता ‘इवा’ या बाईकमध्ये असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सर्वप्रकारच्या इंधनावर चालणा-या बाईक सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी इवाच्या इलेक्ट्रॉनिक बाईकमध्ये परमनंट
मॅगनेट ऑईल कूल्ड मोटर बसविण्यात आली आहे. ही मोटार ७०kW पॉवरसह १७० Nmटॉर्क जनरेट करते. स्पोर्ट मोडवर ही बाईक ताशी २०० किलोमीटरचा वेग धारण करते. फायबरग्लास पॅनेल आणि स्टील टॅब्यूलर प्रेमचा वापर करण्यात आलेल्या इवामध्ये बॅटरीसह इलेक्ट्रीक इर्न्वटर, चार्जर आणि ऍन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा समावेश करण्यात आला आहे. या बाईकला ब्ल्यूटय़ूथ आणि जीपीएसची सुविधाही देण्यात आली आहे. ‘इवा’त वापरण्यात आलेली ही टेक्नोलॉजी आगामी काळात तयार करण्यात येणा-या इकोफ्रेंडली मोटारबाईकसाठी वापरता येऊ शकते.