रशिया मंगळावर जीवसृष्टी तपासासाठी पाठविणार सूक्ष्मजीव

mars
मॉस्को- रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर जीवसृष्टी टिकेल की नाही यासाठी काही पावले उचलली असून सॅटेलाइट बायोन एम २०२० द्वारे अतिशय प्राचीन बॅक्टेरिया बायोलॉजिकल मंगळावर पाठविण्यात येणार आहे.

मंगळावर हे सुक्ष्मजीव जगू शकतात का? त्याही पलीकडे त्यांची तेथे वाढ होऊ शकते का असे या चाचण्यांद्वारे तपासली जाणार आहे. अमीबा, प्रोटोझोआ, सिलिएट्स सुद्धा पाठवले जाणार आहेत. अतिप्राचीन बॅक्टेरिया हे सायबेरियात सापडले आहे. या प्रयोगाला रशियन अॅकेडमी ऑफ सायन्सेस स्पेस बोर्डने हिरवा कंदील दिला आहे.

Leave a Comment