निस्सान, रेनॉलट, स्कोडा कारच्या किमतीमध्ये वाढ

motor
नवी दिल्ली – लवकरच आपल्या कारच्या किमतीमध्ये ३ टक्के वाढ कार उत्पादक कंपन्या स्कोडा, निस्सान आणि रेनॉ करणार आहेत. निस्सान मोटर इंडिया या कंपनीने आपल्या निस्सान आणि रेनॉलट कंपनीने डस्टर या प्रकारातील कारच्या किमतीमध्ये एक जानेवारीपासून ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कारच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय कारच्या निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे घेण्यात आला. कारची किंमत जरी वाढवण्यात आली तरी विक्रीमध्ये फारसा प्रभाव पडणार नाही आणि कंपनी कार विक्रीच्या स्पर्धेमध्ये कायम राहिल, असे कंपनीची एमडी अरुण मल्होत्रा यांनी सांगितले. तसेच रेनॉलट इंडियानेसुद्धा आपल्या कारच्या किमतीमध्ये जानेवारी महिन्यापासून तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment