चीनी स्मार्टफोन चार्जिंगशिवाय १० दिवस चालणार

mobile
मुंबई: आपण जर आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअपने त्रस्त असाल तर तुमच्या आनंदाची बातमी आहे, कारण ओउकीटेल ही चीनी मोबाईल उत्पादक कंपनी एक असा स्मार्टफोन आणणार आहे ज्याच्या बॅटरीची क्षमता तब्बल १०,००० एमएएच एवढी आहे. त्याचबरोबर या कंपनीने या स्मार्टफोनची बॅटरी एक दोन दिवस नव्हे तर तब्बल १० दिवसांपर्यंत चालू शकते असा दावा केला आहे. आता बॅटरीच्या तक्रारीने हैराण असणाऱ्यांना हा स्मार्टफोन नक्कीच पर्वणी ठरू शकतो.

काय आहेत या स्मार्टफोनचे फीचर्स: याचा डिस्प्ले ५.५ इंच आणि ७२० पिक्सल रेझोल्यूशनचा असून १ GHz मीडियाटेक एमटी ६७३५ क्वॉड कोअर चिपसेटचा प्रोसेसर यात देण्यात आला आहे. यात २ जीबीचे रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी आणि ८ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप बेस आहे. त्याचबरोबर यात ४ जी एलटीई, ब्ल्यूटूथ, आणि वाय-फाय अशी कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास १६,००० पर्यंत असू शकते.

Leave a Comment