इस्रो सिंगापूरचे सहा उपग्रह अंतराळात सोडणार

isro
चेन्नई- सिंगापूरचे सहा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) अंतराळात सोडण्यात येणार आहेत. श्रीहरीकोटा येथे या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हे उपग्रह सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सोडले जाणार आहेत. या उपग्रह प्रक्षेपणाचे ५९ तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोचे पीएसएलव्ही रॉकेट हे उपग्रह ५५० किलोमीटरवर नेऊन सोडणार आहे. यातील एका उपग्रहाचे ४०० किलो आहे तर दोन मायक्रो उपग्रह तर तीन नॅनो उपग्रह आहेत. हा सिंगापूरचा पहिला व्यावसायिक उपग्रह असून त्याचा वापर रिमोट सेन्सिससाठी केला जाणार आहे. इस्रोची व्यावसायिक कंपनी अॅँट्रिक्स कॉर्पोरेशन हिने २० देशांचे ५१ उपग्रह सोडलेले आहेत.

Leave a Comment