इनफोकसने लॉन्च केला सेल्फीप्रेमींसाठी ‘इनफोकस एम६८०’

infocus
मुंबई : स्मार्टफोन युजर्समध्ये हल्ली सेल्फी काढण्यासाठी अक्षरश: चढाओढ असते. मित्र-मैत्रिणीसोबत सेल्फी, एखाद्या ऐतिहासिक वास्तूसोबत सेल्फी, गाडीतून सेल्फी, रस्त्यावर चालताना सेल्फी इत्यादी इत्यादी… हल्ली सेल्फीचे अक्षरश: लोण पसरले आहे.

इनफोकस कंपनीने आजच्या तरुणांचे सेल्फीप्रेम हेरत इनफोकस या स्मार्टफोन कंपनीने अशा सेल्फीप्रेमींसाठी एक खास स्मार्टफोन लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे नाव ‘इनफोकस एम६८०’ असे आहे. १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ४जी कनेक्टिव्हिटीही देण्यात आली असून याची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅफडीलवर फ्लॅश सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. सिल्व्हर आणि गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल २१ डिसेंबरपासून सुरु होणार असून रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी (१०८०×१९२० पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्याची पिक्सेल डेन्सिटी ५०१ पीपीआय आहे. १.५ गीगाहर्ट्झची क्लॉक स्पीड देणारी मीडियाटेकची एमटी६७५३ ऑक्टा-कोर चिपसेट वापरण्यात आली आहे. मल्टी-टास्किंगसाठी २ जीबी रॅम देण्यात आले असून इनबिल्ट स्टोरेज १६ जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवली जाऊ शकते. हायब्रिड ड्युअल-सिम स्लॉटही देण्यात आले आहे.

Leave a Comment