भारतात बुलेट ट्रेनच्या अन्य मार्गांसाठी चीन मदतीस तयार

bullet
दिल्ली- भारतातील पहिली वहिली मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन उभारणीचे कंत्राट जपानकडे गेले असले तरी भारतात अन्य मार्गांवर सुरू होणार्याद बुलेट ट्रेन प्रकल्पात सहकार्य करण्याची चीनची तयारी असल्याचे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते होंग ली यांनी सांगितले. जपानकडे बुलेट ट्रेन प्रकल्प गेल्यासंदर्भातल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले.

होंग ली म्हणाले, भारतीय अधिकार्‍यांनीही बुलेट ट्रेनच्या अन्य मार्गांसाठी चीनी गुंतवणुकीस अजूनही संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांनी भारताच्या नुकत्याच केलेल्या दौर्याहत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भातील करारांवर सह्या केल्या आहेत. त्यासाठी प्रकल्प खर्चापैकी ८.१ अब्ज डॉलर्स सोप्या अटींवर जपान गुंतविणार आहे.

Leave a Comment