अॅपलने त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपॅड प्रो सोमवारी भारतात अॅपल स्टोअर्समधून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. या आयपॅडच्या ३२ जीबी व्हर्जनसाठी ६७९००, १२८ जीबी साठी ७९,९९० तर फोरजी एलईटीसहच्या १२८ जीबी आयपॅडसाठी ९१,९०० रूपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.
अॅपलचा आयपॅड प्रो भारतात दाखल
या आयपॅडसाठी १२.९ इंची डिस्प्ले दिला गेला असून हे आयपॅड आत्तापर्यंतच्या आयपॅडपेक्षा अधिक वेगवान आहे. त्याला डिटॅचेबल कीबोर्ड व स्टायलस दिला गेला आहे. अॅक्सेसरीजमध्ये अॅपल पेन्सिल ( किमत ८६०० रूयपे), स्मार्ट की बोर्ड ( १४९०० रू.), आयपॅड प्रो सिलीकॉन केस (६१०० रू) सामील आहेत. त्याला चार स्पीकरवाली ऑडिओ सिस्टीमही दिली असून बॅटरी लाईफ १० तासांचे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे आयपॅड सप्टेंबरमध्येच लाँच केले गेले होते ते भारतात आता उपलब्ध करून दिले गेले आहे.