शाओमीने लाँच केला रेडमी नोट प्राइम ४जी स्मार्टफोन

xiaomi
मुंबई: भारतात रेडमी नोट प्राइम हा स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने लाँच केला असून आहे. याची किंमत रु. ८,४९९ असून उद्यापासून सकाळी १० वाजल्यापासून हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. भारतातच रेडमी नोट प्राइम हा स्मार्टफोनची निर्मिती केल्याचे शाओमीने सांगितले आहे.

शाओमीच्या रेडमी नोट प्राईम स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा आयीपीएस आणि ७२०×१२८० रेझ्युलेशन पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ड्युल सिम सपोर्ट असून यात १.२ गीगाहर्त्झ क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात २ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल स्टोरेज क्षमता देखील देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याची स्टोरेज क्षमता ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ४.४ किटकॅट बेस आहे. या १३ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता ३१०० mAh एवढी देण्यात आली असून ३जी, ४जी, जीपीआरएस, ब्ल्यूटूथ, मायक्रो-यूएसबी कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment