योगगुरू अय्यंगार यांना ‘गूगल’ची आदरांजली

Ayyangar
वॉशिंग्टन: भारतातच नव्हे; तर जगभरात हठयोगाचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत बी के एस अय्यंगार यांच्या जयंतीनिमित्त ‘गूगल’ने खास ‘डूडल’द्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी झाला. अय्यंगार यांनी देशभरातच नव्हे तर जगभरात शुद्ध स्वरूपातील हठयोगाचा प्रसार केला. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जात. जगभर योग लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.

अय्यंगारांच्या अतुल्य कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना सन १९९१ मध्ये पद्मश्री, सन २००२ मध्ये पद्मभूषण; तर सन २०१४ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविले. वयाच्या ९६व्या वर्षी दि. २० ऑगस्ट २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.

Leave a Comment