मायक्रोमॅक्स आगामी वर्षात देणार १० हजार ५०० रोजगार

micromax
नवी दिल्ली : लवकरच तीन नव्या कंपन्या भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी सुरु करत असून पुढील काही महिन्यांत यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी कऱणार आहे. पुढील वर्षात हे नवे कारखाने राजस्थान, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सुरु केले जाणार असल्यामुळे नवीन वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

तेलंगणामध्ये आम्ही २० एकर जमीन घेतली आणि तेथे कारखान्याचे कामही सुरु झाले आहे. राजस्थानमध्येही २५ एकर जमीन घेतली असून तेथे लवकरच काम सुरु होणार आहे. तिरुपतीमध्येही लवकरच काम सुरु केले जाणार असल्याची माहिती मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल यांनी दिली. ३ हजार ते ३५०० लोकांना प्रत्येक कारखान्यात रोजगार दिला जाणार आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादक केंद्र बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Leave a Comment