ट्विटर, स्काइपवर बांगलादेशमध्ये बंदी

skype
ढाका- लोकप्रिय असलेल्या मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर आणि स्काइपवर बांगलादेश सरकारने बंदी घातली असून ही बंदी सुरक्षेचे कारण सांगून घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही साईट रविवारी रात्रीपासून बंद करण्यात आल्या आहेत.

बांगलादेशात गेल्या महिन्यात दोन युद्ध-गुन्हेगार नेत्यांना फाशी देण्यात आल्यामुळे सोशल नेटवर्कींग साईटवर कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता असल्याने सरकारने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. याआधी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरही बांगलादेश सरकारने बंदी घातली होती. मात्र, त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितल्यामुळे ही बंदी मागे घेण्यात आली.

Leave a Comment