लवकरच गूगल वॉलेटचे नवे फीचर

google-wallet
मुंबई : गूगलच्या वॉलेट अॅपचे नवे अपडेट लवकरच येणार असून अनेक नवे फीचर्स या अपडेटमध्ये गूगल समावेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. पैसे ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया गूगल वॉलेटच्या नव्या फीचरमुळे पूर्णपणे बदलणार आहे.

गूगल वॉलेटच्या नव्या अपडेटनुसार, ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीला ई-मेल आयडी देण्याऐवजी आता मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीला सिक्युरिटी कोड असलेला एक टेक्स्ट मेसेज मिळेल. त्यानंतर त्या व्यक्तीला ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करायचे आहे, त्या अकाऊंटचे डेबिट कार्ड नंबर द्यावे लागेल. या अगदी सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर होणार आहेत. विशेष म्हणजे, ही पूर्ण प्रक्रिया अगदी काही मिनिटांची असणार आहे.

Leave a Comment