पहिले टेस्टट्यूब पपी जन्मले

kutra
मानवाला आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम प्रजनन प्रणालीमुळे स्वतःचे अपत्य जन्माला घालण्याचे वरदान संशोधकांच्या प्रयत्नातून मिळाले असतानाच आता दुर्मिळ होत चाललेल्या कुत्र्यांच्या प्रजाती जन्माला घालण्यासाठीही हेच वरदान उपयुक्त ठरले आहे. गेली कांही वर्षे म्हणजे अगदी ७० च्या दशकापासून त्यासाठी संशोधक संशोधन करत होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना जून २०१५ मध्ये यश मिळाले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सात बीगल व बीगल कॉकर स्पेनियल मिश्र जमातीची पिल्ले जन्माला आली आहेत. जून २०१५ मध्येच ही पिले जन्मली असली तरी सायन्स मासिकात हे संशोधन प्रसिद्ध होईपर्यंत ही बातमी गुप्त ठेवली गेली होती असे सांगितले जात आहे.

कार्नेल विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले असून त्यात माणसाप्रमाणेच कुत्र्याचे फ्रोजन भ्रूण मादीच्या गर्भाशयात ठेवले गेले. डॉ. अॅलेक्स ट्राविस हे या प्रयोगातले प्रमुख संशेाधक होते. ते म्हणाले जन्माला आलेली सर्व पिले निरोगी व आरोग्यपूर्ण आहेत.या प्रयोगाच्या यशामुळे माणसांप्रमाणेच कुत्र्यांच्या वांशिक आजारावरही उपचार करणे शक्य होणार आहे.

Leave a Comment