‘हिरो’ने लाँच केली १५० सीसीची नवी ‘हंक’

hero
नवी दिल्ली – १५०सीसी इंजिनचा समावेश असलेले ‘हंक’ बाईकचे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन बाईक निर्मिती क्षेत्रातील भारताची आघाडीची कंपनी ‘हिरो’ने लाँच केले आहे. दोन श्रेणींमध्ये ही नवी बाईक लाँच करण्यात आली असून दिल्ली एक्सशोरूममध्ये सिंगल डिस्क ब्रेक हंकची किंमत ६९,७२५ रूपये, तर डबल डिस्क ब्रेकची किंमत ७२,८२५ रूपये असेल.

‘हिरो’कडून अधिकृतरीत्या हंकच्या नव्या व्हर्जनच्या लाँचींगबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी हंक फेसलिफ्टची संपूर्ण माहिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. नवी फेसलिफ्ट हंक सहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये गोल्ड ब्राऊन, ब्लेजिंग रेड, पँथर ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक, ऍबोनी ग्रे आणि फोर्स सिल्व्हर रंगांच्या बाईकचा समावेश असेल.

फारसा बदल या बाईकच्या डिझाईनमध्ये करण्यात आल नसला तरी या फेसलिफ्ट व्हर्जनला नवीन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. स्पीडोमीटर आणि इन्स्ट्रूमेंट क्लस्टरला साईड स्टँड इंडिकेटर तसेच पेट्रोल टँकवर नवीन स्कूप देण्यात आला आहे. नव्या हंकमध्ये १५० सीसी एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, ते १५.६ बीएचपी पॉवर आणि १३.५० एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय ५ स्पीड गिअर बॉक्स, प्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन, बॅकला ट्विन शॉकर असून, डबल डिस्क बेकचा पर्यायसुद्धा देण्यात आला आहे.

Leave a Comment