जगातील ग्लॅमरस राजकारणी महिला

collarge
राजकारण हे क्षेत्र आणि ते गाजवणारे राजकारणी यांची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. दिग्गज राजकारणी हे वयाने प्रौढ, किंवा म्हातारपणाकडे झुकलेले असतात. त्यांच्याकडे श्रीमंती, प्रसिद्धी, सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा असली, तरी ग्लॅमरस व्यक्तिमत्व अभावानेच असते. हे क्षेत्र पूर्वापार पुरुषप्रधान मानले गेले आहे. वारसाहक्क किंवा घराणेशाही असेल, तरच स्त्रिया या क्षेत्रात येत असत. परंतु, विसाव्या शतकात ही परिस्थिती बदलत गेली आणि महिला राजकारणात यायला लागल्या, नेतृत्व करू लागल्या. काही ठिकाणी त्यांच्या हातात सत्ताही जायला सुरुवात झाली. या बदलामुळे राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. काही राजकारणी महिला जगभरात सर्वांत ग्लॅमरस मानल्या जातात. कोणत्याही फिल्म अॅक्ट्रेस किंवा मॉडेलपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्व कमी ग्लॅमरस नाही. या यादीतल्या पहिल्या दहा महिलांबाबत थोडेसे….

“ल्युसियाना लिऑन – पेरू”
1-Luciana-Leon-–-Peru
सौंदर्याचा किंवा ग्लॅमरचा राजकारणातील यशात किती वाटा आहे, हा वादाचा मुद्दा ठरू शकेल. परंतु, पेरू देशातील संसद सदस्या असलेल्या ल्युसियाना लिऑन यांना आतापर्यंतची सर्वांत ग्लॅमरस आणि सुंदर राजकारणी महिला असं निर्विवादपणे म्हटलं जातं. ल्युसियाना ही एका राजकारणात कार्यरत असलेल्या कुटुंबातली कन्या. ती उच्चशिक्षितही आहे. लिमा विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि सॅन मार्टिन दे पोरेस या विद्यापीठातून तिने मास्टर ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी ही पदवीही घेतली आहे. ल्युसियना वयाच्या ३१ व्या वर्षी पेरूच्या संसदेत निवडून आली आणि पेरूवियन संसदेतील सर्वांत तरूण सदस्य ठरली.

“मारिया कारफॅग्ना – इटली”
2-Maria-Carfagna-–-Italy
मोस्ट ग्लॅमरस पोलिटिशयन्सच्या यादीत मारिया कारफॅग्ना यांचचं नाव येणं अटळ आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी मारिया ही मॉडेल म्हणून काम करत होती. त्यामुळे स्टाईल आणि सौंदर्य हे तिच्यात अंगभूतच आहे. मॅक्झिमच्या वर्ल्डस हॉटेस्ट पोलिटिशयन्स या सर्व्हेमध्ये मारिया कारफॅग्ना पहिल्या क्रमांकावर होती. ही इटालियन सुंदरी मूळची सालेर्नो या गावाची आहे. सन १९९७ मध्ये मिस इटली या सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यापूर्वी तिने कायद्याचा अभ्यास केला आहे. या स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावल्यानंतर मारियाने व्यावसायिक मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. रविवारच्या टीव्ही शोजमध्ये शो गर्ल म्हणूनही तिने काम केले. मॅक्झिम मासिकासाठी तिने अनेक वेळा न्यूड पोझेसही दिल्या आहेत. मारियाला पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांनी मिनिस्टर ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणून मंत्रीमंडळात जागा दिल्यानंतर तिने ग्लॅमरचे जग मागे टाकले आणि तिची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

“अँजेला गेरेकोउ – ग्रीस”
3-Angela-Gerekou-–-Greece
ग्रीसच्या अँजेला गेरे कोऊ हिची कारकीर्द एक यशस्वी फिल्म अभिनेत्री म्हणून सुरू होती. आयोनियन समुद्रातील कोर्फू बेटांवरची ही सुंदरी १९८० च्या दशकात रुपेरी पडद्यावर आली. अभिनेत्री म्हणून तिने फार काळ काम केले नाही. तिने रोममध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ती राजकारणात आली. सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयात तिने सहाय्यक मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आणि तिची जन्मभूमी असलेल्या कोर्फू आयलंडची ती खासदारही झाली. अँजेलाने स्वत: मनोरंजनाचे क्षेत्र सोडून दिले असले, तरी तिने त्याच क्षेत्रातील जोडीदार पसंत केला आहे. ग्रीक अॅक्टर आणि गायक टोलिस वोस्कोपोलस हा तिचा पती आहे.

“बेलिडां स्ट्रोनाक – कॅनडा “
4-Belinda-Stronach-–-Canada
कॅनेडियन पोलिटिशयन बेलिडां स्ट्रोनाक हे एक बहुमुखी व्यक्तिमत्व आहे. ती एक यशस्वी उद्योजिका आहे, समाजसेविका आहे, राजकारणपटू आहे आणि कौटुंबिक जीवनात दोन मुलांची आईदेखील आहे. या सर्व भूमिकांमध्ये ती कॅनेडियन संसदेची सदस्य म्हणून सर्वाधिक परिचित आहे. फिक्या रंगाची आणि सोनेरी केसांची ही स्त्री २००४ नंतर चार वर्षे कॅनेडियन संसदेत खासदार होती. सुरुवातीला ती कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सदस्य होती. नंतर काही वर्षांनी तिने पक्ष बदलून लिबरल्स पार्टीचे सदस्त्व घेतले.

“युरी फुजिकावा – जपान”
5-Yuri-Fujikawa-–-Japan
काही काळ युरी फुजिकावा ही जगातली सर्वांत सुंदर राजकारणी स्त्री मानली जात होती. काही वेळा तर तिचे टीकाकार तिला राजकारणासारख्या क्षेत्रात येण्यासाठी नको इतकी सुंदर व्यक्ती, असंही म्हणत असत. युरी ही सुरुवातीच्या काळात हाचिनोहे सिटीतील स्थनिक स्वराज्य संस्थेची सभासद होती. ती जपानच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सभासद असली, तरी तिच्या व्यक्त्मित्त्वात मात्र काहीही पारंपारिक किंवा कॉन्झर्वेटिव्ह म्हणावे असे नव्हते.
युरी सौंदर्यवती तर होतीच, पण ती एका वादग्रस्त प्रकरणातही अडकली होती. एका विवाहित राजकारणी पुरुषासह एका हॉटेलबाहेर पडताना कॅमेऱ्यात तिचे चित्रीकरण झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते.

“व्हेरा लिश्का – ऑस्ट्रिया”
6-Vera-Lischka-–-Austria
व्हेरा लिश्का हीदेखील अन्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर राजकारणात आलेली आहे. ती ऑस्ट्रियाची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होती. जॉर्जियाच्या अटलांटा शहरात पार पडलेल्या सन १९६९ च्या समर ऑलिंपिकमध्ये तिने तिच्या देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच वर्षीच्या युरोपियन एससी चँपियनशिप स्पर्धेत व्हेराने ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकही पटकावले होते.खेळाडू म्हणून अशी कामगिरी पार पाडल्यानंतर व्हेरा लिश्काने सन २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तिने मेंबर ऑफ लॅण्डअॅग ऑफ ओबेरोस्टेरिक हे पदही भूषवले.

“युलिया टिमोशेन्को – युक्रेन”
7-Yulia-Tymoshenko-–-Ukrain
युक्रेन हा खूपच परंपरावादी आणि जुनाट विचारसरणीचा देश आहे. त्यामुळे त्या देशात एखादी महिला राजकीय नेतेपदी येणे ही अपवादात्मक घटना म्हणावी लागेल. परंतु युलिया टिमोशेन्को यांनी या सर्व परंपरा मोडून काढत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मान मिळवला.राजकारणात येण्यापूर्वी युलिया ही एक यशस्वी बिझनेसवुमन होती. युक्रेनमधील गाजलेल्या ऑरेंज रिव्होल्यूशनमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. या क्रांतीचं सहनेतेपद तिने सांभाळलं. युक्रेनमध्ये २००४ साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक खूप वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराने डागाळलेली ठरली. त्या नंतर देशभर मोर्चे काढले गेले. हाच विरोध ऑरेंज रिव्होल्यूशन म्हणून ओळखला जातो. दोन वर्षे पंतप्रधान म्हणून काम केल्यानंतर पुढच्या निवडणुकीत मात्र, युलियाला पेट्रो पोरोशेन्को यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

“सारा पॉलिन – यूएसए”
8-Sarah-Palin-–-USA
सारा पॉलिन यांना राजकारणातील सर्वांची आवडती व्यक्ती म्हणणं कदाचित धाडसाचं ठरेल. परंतु, त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे, हे नाकारून चालणार नाही. रिपब्लिकन पक्षाची सदस्य असलेल्या सारा पॉलिन यांनी त्यांचा शाळेपासूनचा प्रेमिक टॉड पॉलिन याच्याशी विवाह करण्यापूर्वी क्रीडा समालोचक आणि क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं होतं.वॅसिला सिटी काउन्सिलची मेंबर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर महापौरपद आणि पुढे अलास्का प्रांताची पहिली महिला गव्हर्नर होण्याचा मानही त्यांनी मिळवला. त्यानंतर मात्र २००८ च्या निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांना हार पत्करावी लागली होती.

“ऑर्ली लेव्ही – इस्राईल”
9-Orly-Levy-–-Israel
इस्राईल या देशाची आताची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सर्वार्थाने अस्थिर आणि अराजकतेची म्हणावी अशी आहे. तरीही या देशात जगातील काही सर्वांत देखण्या राजकीय व्यक्ती आहेत. त्यात ऑर्ली लेव्ही यांचचं नाव घ्यावं लागेल. त्या सध्या इस्राईलच्या संसदेच्या सदस्य आहेत. ही संसद नेसेट म्हणून ओळखली जाते. आज ४१ वर्षांच्या असणाऱ्या ऑर्ली या एका राजकीय कुटुंबातच जन्माला आल्या होत्या. त्यांचे वडील हे देशाचे परराष्ट्रमंत्री होते आणि त्यांच्या भावानेही महापौरपद मिळवले होते. तरीही राजकारणात येण्यापूर्वी ऑर्ली यांनी मॉडेल आणि टीव्ही शोची होस्ट म्हणून तुरळक कामे केली होती.

“ज्युलिया बॉन्क – जर्मनी “
10-Julia-Bonk-–-Germany
या यादीत स्थान पटकावणारी ही जर्मनीतील दुसरी महिला राजकारणी आहे. ज्युलिया बॉन्क हिने पहिली निवडणूक वयाच्या १८ व्या वर्षी जिंकली होती. वयाच्या २९ व्या वर्षी ती जर्मन पार्लमेंटची सर्वांत तरूण सदस्य ठरली. लॅण्डटॅग ऑफ सॅक्सनी या सभागृहाची ती डाव्या विचारसरणीची नेता मानली जाते.
ज्युलियाने शाळकरी वयातच आपल्या राजकीय कारकिर्दीचीही सुरुवात केली होती. वयाच्या चौदाच्या वर्षी ती डेरस्डेन सिटी स्टुडंट काउन्सिलची सदस्य बनली आणि दोनच वर्षांनी ती सॅक्सनी राज्या स्टुडंट काउंन्सिलची स्पीकर बनली होती.

Leave a Comment