नवी दिल्ली : सोमवारी भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एचटीसी’ने नुकताच लाँच केलेला ‘डिझायर ८२८’ हा नवीन स्मार्टफोन दाखल होणार असून १९,९९० रूपये एवढी या फोनची किंमत असून हा फोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून या फोनची विक्री सुरू आहे.
सोमवारी बाजारपेठेत येणार एचटीसीचा डिझायर ८२८
एचटीसी डिझायर ८२८मध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी आणि १०८०३x१९२० पिक्सल रेझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याची ऑपरेटींग सिस्टिम ५.५.१ अँड्रॉईड लॉलीपॉप बेस आहे. त्याचबरोबर यात १.५ गीगाहर्टज् ऑक्टाकोर मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात २ जीबीचे रॅम आणि यात एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याची इंटरनल स्टोअरेज १६ जीबी आहे. तर याच्या बॅटरी क्षमता २८०० एमएएच एवढी आहे. यात थ्रीजी, ४जी एलटीई, वायफाय, ब्ल्यूटय़ूथ, जीपीआरएस, मायक्रोयूएसबीची कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे.