जगातील रोमँटिक शहरे

[nextpage title=”जगातील रोमँटिक शहरे “]
collarge
रोमान्स आणि डेटिंग या जगभरातल्या तरुणाईसाठी स्पेशल गोष्टी असतात. त्या जास्तीत जास्त पर्फेक्ट असाव्यात, असं प्रत्येकालाच वाटतं. पण, प्रत्येकाचाच हा प्रयत्न यशस्वी होतो असं नाही. त्याउलट अयशस्वी डेटिंगची संख्याच जास्त असल्याचं एका वेबसाईटने केलेल्या पाहणीत दिसून आलं आहे. याच पाहणीत रोमान्स आणि डेटिंगसाठी जगातली कोणती शहरे सर्वांत जास्त हॅपनिंग आहेत, याची यादी या साईटने पुरवली आहे.[nextpage title=”पॅरिस”]

1-Paris
अर्थातच या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ते पॅरिस शहर. रोमान्सच्या बाबतीत नेहमीच सर्वांना आकर्षित करत आलेल्या शहराच्या हवेतच प्रेम आहे, असं मानलं जातं. म्हणूनच जगभरातून अनेक लोक इथे प्रेमाच्या शोधात येतात. यासंबंधीच्या पाहणीतून असं दिसून आलं आहे, की पॅरिसमध्ये प्रेमाच्या, रोमान्सच्या शोधात आलेल्या बहुतेकांना त्यांचं प्रेम सापडतं किंवा ते नव्याने समजतं. प्रेमाच्या परिक्षेत पॅरिस शहराने १०० पैकी ८३ गुण मिळवले आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी असं सांगितलं की सिडनी आणि लंडनप्रमाणेच पॅरिसमध्ये प्रेमी जनांसाठी कितीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे इतर अनेक शहरांमधील लोकांनी ऑनलाईन डेटिंगला प्राधान्य दिलं असलं, तरी पॅरिसवासियांसाठी मात्र, अजूनही एकत्र बाहेर किंवा पार्टीला जाणे हा डेटिंगचा सर्वांत चांगला मार्ग असल्याचेही दिसून आले. आणखी एक गोष्ट म्हणजे, पॅरिस शहरातल्या लोकांची डेटिंगसाठीची पहिली पसंती कलावंत किंवा काही सर्जनशील काम करणाऱ्यानाच असते.[nextpage title=”मेलबर्न “]

2-Melbourne
तुम्ही ऑस्ट्रेलियात राहत असाल आाणि आपल्या प्रेमाच्या शोधात असाल, तर मेलबर्न हे शहर तुमच्यासाठी खास ठरेल. रोमान्सच्या बाबतीत या शहराने १०० पैकी ८१ गुण मिळवत अगदी सिडनीलाही मागे टाकले आहे. मेलबर्न हे जगातील महागड्या शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे आणि जगातील सर्वोत्तम निवासी शहर म्हणूनही त्याची निवड झालेली आहे. कदाचित त्यामुळेच रोमान्स आणि डेटिंगच्या बाबतीतही हे शहर वरच्या क्रमांकावर आहे. इथले लोक कष्टाळू आहेत, श्रीमंत आहेत आणि साहजिकच त्यांच्याकडे जगणं एन्जॉय करण्याचे अनेक पर्यायही आहेत. तेही शहरापासून दूर न जाता शहरामध्येच उपलब्ध आहेत. साहजिकच या शहरात तुम्हाला तुमचं प्रेम मिळण्याची शक्यता जास्त आहे. किंवा काही दिवस मौजमजा करण्यासाठी एखादा जोडीदार तर इथे नक्कीच मिळू शकतो.[nextpage title=”क्वालालंपूर”]

3-Kuala-Lumpur
रोमँटिक शहरांच्या यादीत आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या बीजिंग शहराला मागे टाकत मलेशियाच्या क्वालालंपूर शहराने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या शहराने या परिक्षेत १०० पैकी ७४ गुण मिळवले आहेत. क्वालालंपूरचे पुरुष डेटिंगसाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्राधान्य देतात. त्यातही बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना जास्त पसंती दिली जाते. महिलांच्या बाबतीत पाहणी केली असता, त्या मात्र प्रेमासाठी जोडीदार निवडताना एका विशिष्ट क्षेत्रातील पुरुषांना प्राधान्य देताना दिसत नाहीत. [nextpage title=”बीजिंग “]

4-Beijing
रोमान्सच्या बाबतीत चीनच्या बीजिंग शहराचा पहिला वर्ग अगदी थोडक्यात हुकला आहे. १०० पैकी ५९ गुण मिळवून हे शहर शिकागोपेक्षा वरचढ ठरलं आहे. युरोपीय किंवा अन्य शहरांच्या तुलनेत चीनच्या शहरांमध्ये प्रेमाच्या बाबतीतल्या पुढच्या हालचाली जरा जास्त वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे. शेन्जेन शहरातल्या एका व्यक्तीने दिलेल्या उत्तरानुसार इथे तरुण तरुणीच्या तिसऱ्याच भेटीत लग्नाची बोलणी सुरू होतात. इतर ठिकाणी अगदी सहाव्या डेटपर्यंतही तुम्ही इतर कोणाशी डेटिंग करण्यासाठी मोकळे आहात, असं मानलं जातं आणि जवळपास नवव्या भेटीपर्यंत तुम्हाला कोणी अधिकृतपणे प्रेमी युगुल मानतही नाही. बीजिंगमधले स्त्री पुरुष दोघांचीही पसंती बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या जोडीदाराला असते. मुखदुर्गंधी किंवा तोंडाच्या आरोग्याच्या बाबतीतील निष्काळजीपण हे बीजिंगमधील ब्रेक अप्सचे सर्वांत मोठे कारण् असल्याचेही दिसून आले आहे.[nextpage title=”शिकागो”]

5-Chicago
रोमँटिक शहराच्या यादीत पाचवे स्थान मिळवणाऱ्या शिकागो शहराचा स्कोअर आहे १०० पैकी ५८ गुण. म्हणजे बीजिंग शहरापेक्षा फक्त एक गुण कमी. या शहरातले पुरुष हे तेथील स्त्रियांपेक्षा प्रेमाच्या बाबतीत अधिक कुशल असल्याचं मानलं जातं. श्किागो शहरातल्या स्त्रिया मात्र, त्यांच्या डेटिंगच्या किंवा प्रेमसंबंधांच्या बाबतीत अजिबात समाधानी नाहीत. या शहरातील प्रेमाच्या समाधानाचं एकूण प्रमाण १० पैकी ६.५ असं नोंदलं गेलं असलं, तरी इथल्या महिलांच्या बाबतीत ते ५.६ एवढंच आहे. या शहराचं वेगळेपण हे की युरोप अमेरिकेतील इतर शहरांमध्ये डेटिंगसाठी जिथे कलावंतांना प्राधान्य दिलं जातं, तिथे इथल्या महिलांची पसंती बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांना आहे. शिकागोतील महिलांना घाणेरडं राजकारण करणारे पुरुष आवडत नाहीत, तर महिलांचं प्रत्यक्षातलं दिसणं त्यांच्या प्रोफाईल पिक्चरपेक्षा वेगळं असेल, तर ते पुरुषांना पसंत पडत नाही. इथे होणाऱ्या ब्रेक अप्सची ही महत्वाची कारणे आहेत.[nextpage title=”लंडन”]

6-London
डेटिंगसाठी उत्तम समजल्या जाणाऱ्या जगभरातल्या शहरांमध्ये सहावा क्रमांक लागतो. सिडनी शहराप्रमाणेच इतर कुठल्याही ठिकाणच्या लोकांना न मिळणारा एक फायदा इथल्या लोकांना मिळतो, तो म्हणजे इंग्लिश बोलण्याची ब्रिटिश पद्धत ही सर्वांत रोमँण्टिक मानली जाते. लंडनच्या रहिवाशांनीही सिडनीतील लोकांप्रमाणेच या शहरातल्या प्रेमजीवनात भरपूर विविधता असल्याचं सांगितलं आहे. जशी ऑस्ट्रेलियातील कोरल रीफमध्ये विविध रंगांची उधळण पाहायला मिळते, मधूनच एखाद्या शार्कच्या दर्शनाने रोमांच वाढतो, तसंच इथल्या रोमान्सच्या बाबतीतही आहे, असं लंडनवासी मानतात. लंडन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इतिहास आणि संस्कृतीचे समान दुवे लक्षात धेतले, तर या रोमान्समधील समानतेचे आश्चर्य वाटणार नाही.लंडनमघील पुरुषांना डिझायनिंग किंवा फॅशन इंडस्ट्रीतील स्त्रियांचे आकर्षण वाटते, तर महिला कलाकार आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांना सर्वाधिक पसंती देतात. पण, लंडनमध्ये डेटिंग करताना तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. तिथल्या ब्रेक अप्सचे सर्वांत मोठे कारण आहे, तोंडाची दुर्गंधी.[nextpage title=”न्यूयॉर्क”]

7-New-York
जगभरातल्या रोमँटिक शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर असलेलं न्यू यॉर्क शहर एका बाबतीत अपलं वेगळेपण राखून आहे. इतर शहरांमध्ये होणाऱ्या डेटिंगची सुरुवात बहुधा मैत्रीपासून होते, तर न्यूयॉर्कचे ४७ टक्के रहिवासी हे पहिल्या डेटसाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यासाठी मदत करणारे अॅप्स आणि साईटस त्यांच्यासाठी उपलब्घ आहेत. या शहरात डेटिंग करण्याचे प्रमाण खूप असले, तरी हे डेटिंग करणारे त्यांना एंगेज्ड किंवा कमिटेड मानत नाहीत, तर सिंगल मानतात. या एकटेपणामुळे ते खूप दु:खी असल्याचंही ते सांगतात. कदाचित या शहरामधील लैंगिक असमतोल हेही त्याचं कारण असू शकेल. न्यूयॉर्कमधील पुरुष हे तिथल्या डेटिंगसाठीच्या वातावरणमुळे समाधानी आहेत. त्यांच्या मते त्यांना तिथे प्रेमाच्या खूप संधी उपलब्ध आहेत. त्याउलट न्यूयॉर्कवासी स्त्रियांच्या मते मात्र, शहरातील डेटिंग हे एखाद्या युद्धक्षेत्राप्रमाणे आहे. तिथे प्रेम मिळवण्यासाठीही स्पर्धा आहे. [nextpage title=”सिडनी”]

8-Sydney
लंडनप्रमाणेच सिडनीतील इंग्लिश भाषाही खास ब्रिटिश उच्चारांप्रमाणे बोलली जाते. त्यामुळे त्या उच्चारांचा फायदा त्यांना रोमान्सच्या बाबतीत होतोच. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही फायदा होतो. रोमान्स आणि डेटिंगच्या बाबतीतील समाधानाच्या प्रमाणाचा विचार केला, तर सिडनी वासियांना १०० पैकी ५० गुण मिळाले आहेत. म्हणजेच या बाबतीत ते आनंदी आहेत, असे दिसून येते. असे असले, तरी सिंगल असण्यात अभिमान बाळगणाऱ्यांची मोठी संख्याही या शहरात आहे. लंडनवासियांप्रमाणे आणि पॅरिसवासियांप्रमाणेच सिडनीतील लोकही त्यांच्या शहरातील प्रेमाच्या वातावरणाचे वर्णन वैविध्यपूर्ण असे करतात. शेवटी ग्रेट बॅरिअर रीफ हे कोरल रीफ तर ऑस्ट्रेलियातच आहे. त्यामुळे विविधतेचे पाठ तर त्यांना तिथला समुद्रच देत असतो. [nextpage title=”लॉस एंजेलिस”]

9-Los-Angeles
सर्व्हेच्या रिपोर्टनुसार रोमँण्टिक शहरांच्या यादीत लॉस एंजेलिसचा क्रमांक नववा लागत असला, तरी तेथील नागरिकांच्या मते त्यांचे शहर या यादीत टॉपवर आहे. येथील लोकांच्या डेटिंगच्या पद्धतीमंध्ये खूप वैविध्य आहे. एखाद्या डेटसाठी मेहनत घेण्यात या शहरातले लोक आघाडीवर आहेत.
लॉस एंजेलिसमधील हॉलिवूडच्या प्रेमामुळे तेथील स्त्रिया प्रेमप्रकरणासाठी साहजिकच फिल्म किंवा करमणुकीच्या व्यवसायात यशस्वी असलेल्या पुरुषांना पसंती देतात, तर पुरुषांची पसंती फॅशन व्यवसायातील महिलांना असते. ही दोन्ही क्षेत्रे इथे हॉट आणि हॅपनिंग मानली जातात. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या एकट्या व्यक्तीला जोडीदार शोधणे कठीण जात नाही. इथे रिलेशनशिपमध्ये असताना वाईट चाली खेळणं हे ब्रेक अप्सचं महत्त्वाचं कारण असलं, तरी सर्वांत जास्त ब्रेक अप्स होतात ते तुम्ही तुमच्या प्रोफाईल पिक्चरपेक्षा वेगळे दिसत असाल तर![nextpage title=”टोकियो”]

10-Tokyo
रोमँण्टिक शहरांच्या या यादीत अखेरच्या स्थानावर टोकियो शहराने जागा पटकावली आहे. या शहराचे गुण आहेत १०० पैकी ४९. पाश्चिमात्य लोकांसाठी जपानमध्ये प्रेम करण्याचा अनुभव हा त्यांच्या नेहमीच्या अनुभवापेक्षा फारच वेगळा ठरतो. त्यामुळे स्थानिक जपानी व्यक्तीच्या प्रेमात पडून डेटिंग करताना त्यांना अनेक गोष्टींचं भान राखावं लागतं. उदाहरणार्थ, पहिल्याच भेटीत शारीरिक लगट करणं महागात पडू शकतं. इथं पहिल्या स्पर्शासाठीही धीर धरावा लागतो. अनेक सलग भेटीगाठींनंतर तची परवानगी मिळते. हे प्रत्येक जपानी व्यक्तीच्या बाबतीत खरं नसलं, तरी हीच इथली सर्वसामान्य प्रथा आहे. जपानमध्ये गोकोन या नावाने एक परंपरांगत डेटिंगची प्रथा प्रचलित आहे. त्याला ब्लाईंड ग्रुप डेटिंग असं म्हणता येईल. अमेरिकेत अशा ग्रुप डेटस मित्र मैत्रिणींमध्ये आयोजित केल्या जातात, तर जपानी गोकोन या अगदी अनोळखी व्यक्तींबरोबर ठरवल्या जातात. त्यातून नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. परंतु, हे गोकोन एका रात्रीच्या मौजमजेपुरते नसतात, हे लक्षात ठेवायला हवं. कुणाशी तरी रोमान्स आणि डेटिंग सुरू होण्यासाठी किमान पाच सहा गोकोनमध्ये भेट व्हावी लागते. त्यातून आधी मैत्री पक्की होते आणि मग कोणतेही नाते फुलते.

Leave a Comment