गोरिला हा बराचसा माणसासारखा असणारा प्राणी. माणसांशी तो चांगले जमवूनही घेऊ शकतो. आणि माणसाप्रमाणेच त्यालाही दातदुखीचा त्रास होतो हे आता स्पष्ट झाले आहे. पेन्टेन येथील एका प्राणीसंग्रहालयात दाढदुखीने हैराण असलेल्या गोरिल्लावर नुकतीच रूट कॅनाल शस्त्रक्रिया केली गेली. हा गोरिल्ला १८० किलो वजनाचा आहे आणि शस्त्रक्रियेनंतर तो आता पूर्ववत झाला आहे. हा पेशंट गोरिला पेरिटनेक्स नावाने ओळखला जातो.
गोरिलाच्या दाढेचेही रूट कॅनाल
मिळालेल्या माहितीनुसार गोरिल्लाचे वजन जास्त असल्याने शस्त्रक्रिया करताना त्याच्यासाठी विशेष टेबल बनवावे लागले. तसेच माणसाचे रूट कॅनल करताना तेवढीच जागा बधीर केली तरी चालते. मात्र गोरिला कितीही हुषार असले तरी त्यांना माणसासारखे दिशांचे ज्ञान होत नाही. म्हणजे उजवीकडे मान वळव, डावीकडे बघ हे त्यांना कळू शकत नाही. त्यामुळे गोरिलाचे रूट कॅनल करताना त्याला पूर्ण भूल दिली गेली. व्यावसायिक डेंडीस्टने ४० मिनिटांच्या अवधीत हे काम उरकले.