मुंबई : लवकरच न्यूज फीडमध्ये सोशल मीडियात अग्रेसर असलेले फेसबुक बदल करणार आहे. फेसबुकच्या स्मार्टफोन अॅपमध्ये या बदलानंतर काही बदल केले जाणार आहेत. स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे अनेकदा एखाद्या पोस्टवरील कमेंट पोस्ट होण्यास वेळ लागतो. मात्र युजर्सची ही अडचण फेसबुकच्या नव्या फीचरमुळे दूर होणार आहे. नव्या फीचरनुसार युजर ऑफलाईन असतानाही कमेंट पोस्ट करु शकणार आहेत. फेसबुकच्या मते, युजर्सना ऑफलाईन कमेंट पोस्टचे फीचर फायद्याचे ठरेल. स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे फेसबुकपासून दोन हात लांब राहणाऱ्यांना पुन्हा फेसबुकशी जोडण्यासाठी हे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे.
आता इंटरनेटची नाही गरज फेसबुक पोस्टवर कमेंटसाठी !
मात्र, एखाद्या पोस्टवर ऑफलाईन असताना कमेंट केल्यानंतर ती कमेंट पटकन लाईव्ह जाणार नाही. जेव्हा तुमचा स्मार्टफोन स्ट्राँग नेटवर्कमध्ये येईल, तेव्हा ती कमेंट पोस्ट होईल. फेसबुकने न्यूज फीडमध्येही बदल केला आहे. फेसबुक असे अपडेट आणणार आहे, ज्यामध्ये असे कंटेट पहिले दिसेल, जे डाऊनलोड केल्यानंतरही युजरने कंटेट पाहिलेले नाही. फेसबुकने या दोन्ही नव्या फीचर्ससंबंधी टेस्टिंग सुरु केल्यामुळे लवकरच युजर्सच्या सेवेत हे फीचर्स दाखल होणार आहेत. फेसबुकच्या या अपडेटमुळे इंटरनेट प्रसारासाठीही मदत होणार आहे. कारण फेसबुक अॅप बॅकग्राऊंडला चालू राहील आणि डेटा खर्च होईल.