९० हजार कार परत बोलावणार होंडा

honda
नवी दिल्ली – यावर्षी कार परत बोलावण्याची सर्वात मोठी घोषणा होंडा कार्स इंडिया लिमिटेडने केली आहे. ९०,२१० कार कंपनी यावेळी परत बोलावणार आहे. कंपनीने हा निर्णय फ्युएल रिटर्न पाईपमध्ये त्रुटी असल्याने घेतला आहे. या पाईपची बदली कंपनी करून देणार आहे. डिसेंबर २०१३ पासून जुलै २०१५ या कालावधीमध्ये होंडाने भारतामध्ये उत्पादन केलेल्या सेडान सिटी, एमपीव्ही मोबोलियो या कार परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही कंपनीने कार परत बोलाविल्या होत्या. यामध्ये सर्वात जास्त सेडान सिटी कारची संख्या होती. कंपनीने सप्टेंबरमध्ये प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हिएकलमध्ये सीआर-व्ही, सेडान सिव्हिक, सिटी, आणि हॅचबॅक जॅझ या मॉडेलमधील २.२४ लाख कार परत बोलाविल्या होत्या. या कारमध्ये एअरबॅक इन्फ्लेटर्समध्ये चूक होती. या कारचे उत्पादन २००३ ते २०१२ दरम्यान झाले होते. सोसायटी ऑफ इंडियन ऍटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेने जुलै २०१२ मध्ये नवीन नियमावली सुरू केल्यानंतर भारतामध्ये कार परत बोलावण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत १३ लाख कार परत बोलावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment