सर्वात आलिशान एअर केबिन्स

collarge
जगभ्रात विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सर्वच एअरलाईन्स विमानातील आसनांची संख्या वाढवत आहेत, यात काही नवल नाही. त्यामुळे सर्वच विमानांच्या इकॉनॉमी क्लासमघील आसनांची संख्या वाढते आहे आणि केबिन्स अधिकाधिक चिंचोळी होत चालली आहेत. मात्र, त्याच वेळी विमानांच्या पुढच्या भागातील सोयी सुविधा अधिक चांगल्या होत आहेत. विमानाच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणार्‍यांना आरामात झोपता येईल अशा सीटस, मोठे स्क्रीन्स किंवा इतर आवाजांचा त्रास होणार नाही असे हेडफोन्स हे नवीन नाही. परंतु, आजकाल या प्रवाशांसाठी विशेष स्लिपिंग पॉडस, हॉटेलसारखे खाजगी सूटस, मसाज चेअर्स, शॉवर्स किंवा चक्क मोठी सुसज्ज बेडरूम्स अशा सुविधा विमानाच्या आत पुरवण्याकडे कंपन्यांचा कल आहे. त्यासाठी सर्व मोठमोठया कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अर्थातच या सुविधांसाठी मोजावी लागणारी किंमतही तशीच जबर आहे. यात सिंगापूर एअर सूट क्लासच्या तिकिटाची किंमत सर्वाधिक आहे. न्यूयॉर्क ते सिंगापूर या प्रवासासाइी तब्बल 23,000 डॉलर्स. जगभरातल्या अशा कंपन्यांच्या आलिशान एअर केबिन्सची ही माहिती.

सिंगापूर एअरलाईन्स
1-singpore-airlines
सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानांचे एअर सूटस इतरत्र कुठेही मिळणार नाही असा शाही अनुभव आपल्या खास प्रवाशांना देतात. या केबिन्सना सरकते दरवाजे आणि खिडक्यांना ब्लाईंडस लावलेले असल्याने प्रवाशांना हवी तेवढी प्रायव्हसी मिळू शकते. या कंपनीच्या विमानांमघील पहिल्या वर्गातील सीट अमेरिकेतील बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जोडीने तयार करण्यात आले आहे. ३५ इंच रुंदीची ही आसने आडवी केली की चक्क डबलबेडएवढी होतात. त्यामुळे ती जगातली सर्वांत मोठी एअरसीटस मानली जातात.या क्लासच्या प्रवाशांचे स्वागत विमानात डोम पेरिग्नॉन या मासिकांच्या श्रेणीने आणि गिव्हन्ची ब्रॅण्डच्या परफ्यूमच्या गिफ्ट पॅकने केले जाते. विमानात त्यांच्या मनोरंजनासाठी २४ इंची टच एलसीडी स्क्रीन्स आणि बोशचे हेडफोन्स हजर असतात. प्रवासादरम्यानच्या खाण्यापिण्यासाठी उत्तम वाईन्स आणि कुशल बल्लवाचार्यांचे एक पथक बदलत्या मेन्यूसह हजर असते. फ़्लाईटच्या चोवीस तास आधी सूचना दिली, तर त्यांच्या आवडीनुसार जेवणाचा मेन्यू ऑर्डर करता येतो. सर्वांत महागडी असलेली ही विमानसेवा तितकाच राजेशाही अनुभव नक्कीच देते.

“एतिहाद डायमंड फर्स्ट”
2-Etihad-Diamond-First
जगातल्या सर्वांत महागडया आणि आलिशान विमानसेवांपैकी एक; असा लौकिक कमावलेली ही कंपनी आपल्या प्रवाशांना विमानसफरीचा मस्त अनुभव देण्यासाठी अनेक सोयी सुविधा पुरवते. त्यात खाजगी केबिन किंवा चक्क खाजगी अपार्टमेंट, स्वतंत्र डायनिंग टेबल्स अशा सोयी मिळतात. या विमान कंपनीच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणार्‍यांना विमानात हजर असलेल्या शेफकडून आवडीचा मेन्यू तयार करुन घेता येतो. या पदार्थांची यादी जगभरातल्या उत्तमोत्तम हॉटेलमधील मेन्यूवरून तयार केली जाते. त्यांच्यासाठी विशेष कॉगनॅक सेवा पुरवली जाते आणि निवडक वाईन्समधून त्यांना आवडीची वाईनही घेता येते.खास प्रवाशांच्या करमणुकीसाठी स्वतंत्र २४ इंची स्क्रीनवर ७५० तासांच्या करमणुकीच्या कार्यक्रमांची सोय आहे. शिवाय संपूर्ण प्रवासात मोबाईल आणि इंटरनेट वापरता येते. रात्रीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना विशेष पेय, इअर प्लग्ज, आवाजाचा त्रास टाळणारे हेडफोन्स, उशा, रात्री घालण्यासाठी कपउे, ग्रुमिंग आणि पर्सनल केअर किट आणि त्यांच्या खाजगी जागेत विनाव्यत्यय शांततेत रात्र घालवण्याची सुविधाही मिळते.

“एमिरेटस फर्स्ट क्लास सूटस”
3-Emirates-First-Class-Suit
इतर अनेक विमानकंपन्यांप्रमाणे एमिरेटस एअरलाईन्स आपल्या प्रवाशांसाठी एक कॉमन फर्स्ट क्लास विभाग आणि खाजगी फर्स्ट क्लास सूटस अशा दोन्ही सुविधा देते. यातल्या खाजगी सूटमघ्ये सरकते दरवाजे आाणि सुंदर वातावरणमिर्मिती करणारी प्रकाशयोजना केलेली असते. त्याचबरोबर जेवण आणि वाईन्सचा उत्तम मेन्यू आणि मनाजोगते पेय निवडता येईल असा ऑनबोर्ड लाउन्जही या विमानात आहे. या लाउन्जमध्ये दर्जेदार स्पिरिटस, वाईन्स, शँपेन्स, कॉकटेल्स मिळू शकतात आणि त्यासाठी एक खास बार टेन्डरही तैनात असतो. या विमानसेवेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यातील शॉवर आणि स्पा. या सेवेमुळे प्रवासी विमानातून उतरण्यापूर्वी ताजेतवाने होतात. विमानातून उतरताना त्यांना ब्रॅण्डेड टॉयलेटरीज आणि स्पा प्रॉडक्टचे किट भेट दिले जाते.

“एएनए फर्स्ट स्क्वेअर”
4-ANA-First-Square
या विमानांमधील फर्स्ट क्लास केबिनचं वैशिष्ट्य म्हणजे ऑफिसमधील क्युबिकलसारख्या चौरस सीटस. ही आरामदायक आसने लेदरची आहेत आणि त्यात अनेक सीट कन्ट्रोल्स दिले आहेत. त्यामुळे एका बटनावर ही आसने सरळ होतात आणि बेडसारखी आडवीही करता येतात. या केबिन्समध्ये काम करण्यासाठी भरपूर वर्किंग प्लेस मिळेल अशीही व्यवस्था आहे.इकॉनॉमी क्लासमध्ये मिळणाऱ्या ठराविक पॅक फूडऐवजी या क्लासमध्ये विविघ् पदार्थ सर्व्ह केले जातात. उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थ आणि ताज्या सी फूडचीही या मेन्यूमध्ये रेलचेल आहे. झोपताना आरामदायक वाटेल अशा कपड्यांची जोडी, उबदार दुलई, स्लिपर्सची जोडी आणि प्रवासात थंडीचा त्रास होउ नये यासाठी कर्डिगनही विमान कंपनीतर्फे दिले जातात.

“कतार एअरवेज “
5-Qatar-Airways
कतार एअरवेजने आपल्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या उत्तम सेवेसाठी याआधीच अॅवॉर्ड पटकावले आहे. ही दर्जेदार सेवा, प्रशस्त आणि आलिशान प्रायव्हेट केबिन्स यांच्यासह या कंपनीच्या पहिल्या वर्गाच्या प्रवशांना प्रवासाचा एक मस्त अनुभव मिळतो. हे प्रवासी आरामदायक बेडवर झोप काढू शकतात किंवा ऐसपैस खुर्च्यांमध्ये रेलून वैविध्यपूर्ण मनोरंजनाचा आनंद घेतात. या विमानांमध्ये दोन सेलिब्रिटी शेफ या प्रवाशांसाठी १० कोर्सची मेजवानी हजर करतात त्यात अनेक शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची लज्जत चाखता येते. वाईन किंवा इतर मद्यप्रकारांमध्येही निवडीला मोठा वाव असतो. विमान सोडतानाही या प्रवाशांना उंची भेटवस्तू दिल्या जातात.

“व्हर्जिन अटलांटिक”
6-Virgin-Atlantic
रिचर्ड ब्रॅन्सन याच्या धडाकेबाज कामाच्या पद्धतीचा थेट आणि उघड परिणाम व्हर्जिन अटलांटिकच्या पहिल्या वर्गाच्या सूट्समध्ये पाहायला मिळतो. आराम आणि शान यांच्या नव्या व्याख्याच या कंपनीने तयार केल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या प्रवासात लागेल ते सर्व काही पुरवण्याकडे कंपनीचा कटाक्ष असतो प्रवासादरम्यान काम करणाऱ्यांसाठी या एअरलाईन्सच्या केबिन्समध्ये वर्किंग स्टेशनच्या सर्व सुविधा आहेत. त्यात टेबल आणि लॅपटॉपसाठी जागाही आहे.

प्रवासात आराम करणाऱ्यांसाठी प्रत्येक सूटमध्ये १०.४ इंची टीव्ही आणि त्यावर तीनशेहून अधिक मुव्हीज पाहण्याची सोय आहे. . २२ इंची आरामदायक सीटस प्रशस्त बेडसारख्या पसरता येतात. त्यामुळे प्रवाशांना मस्त झोपही काढता येते.जेवणाच्या बाबातीत या कंपनीने स्टार शेफ लॉरेन पास्कल याला करारबद्ध करून घेतले आहे. त्यामुळे या विमानातला जेवणाचा अनुभवही अफलातून असतो.

“एअर फ्रान्स”
7-air-france
टॉप एअरलाईन्सच्या यादीत असूनही एअर फ्रान्सने इतर कंपन्यांपेक्षा एक वेगळेपण राखले आहे. उच्च तंत्रज्ञान आणि हायफाय सुविधांपेक्षा ही कंपनी साधेपणा आणि नजाकतीवर भर देते. या कंपनीच्या विमानांत फर्स्ट क्लास सूटसमध्ये फक्त एक २४ इंची टचस्क्रीन टीव्ही आहे आणि उंची हॉटेलच्या दर्जाचे आरामदायी बेड आहेत. भरपूर स्टोअरेज स्पेस आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एका वेळी या क्लासमध्ये फक्त ४ ते ९ प्रवाशांना प्रवास करता येतो. म्हणजेच त्यांची प्रायव्हसी जपली जाते. या कंपनीचा सगळा भर प्रवाशांना जास्तीत जास्त आरामदायक वातावरण देण्यावर आणि त्यांनी कामाच्या मध्ये एक मस्त ब्रेक घ्यावा यावर आहे. जेवणाचा उत्तम मेन्यू, दर दोन महिन्यांनी अपडेट केली जाणारी वाईन लिस्ट हेही इथे आहेच. मस्त फ्रेंच वाईन्स, चविष्ट जेवण् आणि कोझी वातावरण यात कामाचा विचारही येणार नाही, हेही खरंच!

“जेट ब्लू मिंट”
8-JetBlue-Mint
या यादीतील बहुतांश एअरलाईन्स या महागड्या कंपन्या आहेत, पण जेट ब्लू मिंट ही कंपनी यालला अपवाद आहे. ही एक इकॉनॉमी एअरलाईन कंपनी मानली जाते. तरीही तिच्या विमानांमघील पहिला वर्ग हा कोणत्याही लक्झरी एअरलाईन्सच्या विमानांशी स्पर्धा करेल असा आहे. तो ही तुलनेने कमी किमतीत. प्रायव्हसी हवी असणाऱ्या प्रवाशांसाठी यात चार स्वतंत्र सूटस आहेत. कॉमन फर्स्ट क्लास विभागात बेडप्रमाणे आडव्या करता येणाऱ्या सीटस आणि सरकते दरवाजे आहेत. फ्री वायफाय, १५ इंची इंटरअॅक्टिव्ह व्हिडिओ स्क्रीन्स, १०० हून जास्त चॅनेल्स हेही आहे. विमानातील जेवणाच्या व्यवस्थेसाठी कंपनीने न्यूयॉर्क मधील सॅक्सन प्लस पॅरोल या ख्यातनाम रेस्टारंटबरोबर करार केला आहे. त्यानुसार प्रवाशांसाठी रोज ताजे आणि स्पेशल पदार्थ तयार केले जातात. या विमानात जेवणापेक्षाही उत्तम दर्जाचे स्नॅक्स उपलब्ध आहेत आणि ते माह – दे- दहर बेकरी आणि अ कोलिशिओ डिस्कव्हरी या ब्रॅण्डचे आहेत. ब्लू मार्बल कंपनीची आईस्क्रीम्सही आहेत. फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एक पर्सनल केअर किट आणि स्नॅक्स फ्री दिले जातात. या सर्व सुविधांची किंमत जवळपास लक्झरी एअरलाईन्सच्या इकॉनॉमी क्लासच्या किमतीएवढी आहे हे विशेष.

“अमेरिकन एअरलाईन्स फ्लॅगशिप “
9-American-Airlines-Flagshi
उत्तम ग्राहक सेवा, युनिक डिशेस आणि मेन्यू यांच्याबरोरच कदाचित सर्वांत आरामदायक सीटस हे या कंपनीच्या विमानांचं वैशिष्ट्य मानलं जातं. फक्त याच कंपनीच्या विमानांमध्ये प्रवासी समोरासमोर बसू शकतात, गप्पा मारू शकतात आणि त्यामुळे या सीटस जास्त आरामदायीही ठरतात. प्रवासादरम्यान थकवा जाणवला किंवा झोप आली, तर या सीटस आडव्या करता येतात आणि झकास ताणून देता येते.

“थाई रॉयल फर्स्ट”
10-Thai-Royal-First
विमानात पाय ठेवल्याबरोबर वेलकम ड्रिकं म्हणन शँम्पेन, ट्रॉपिकल ज्यूसेस किंवा थाई रॉयलचे सिग्नेचर पेय असलेले व्हायोलेट ब्रीझ असे पेय दिले जाते. त्यानंतर प्रवाशांना त्यांच्या अतिशय आरामदायी सीट कम बेडवर बसवले जाते आणि या विमातल्या सुंदर प्रवासाची सुरुवात होते. या सीटस ऑफिस चेअर किंवा बेडसारख्याही वापरता येतात. झोपायचे असेल, तर विमानात मउशार ब्लँकेटस आणि उशा दिल्या जातात.प्रवासादरम्यानचे जेवणही उच्च दर्जाचे, ताजे आणि चविष्ट असते. अनेक कोर्सचे हे जेवण थाई कुझिनच्या परंपरेतले असते. या विमानांमध्ये करमणुकीचीही चांगली सोय आहे. शंभराहून अधिक सिमेमांमधून हवा तो सिनेमा पाहत आपण प्रवास एन्जॉय करू शकतो.

Leave a Comment