नव्या वर्षात रेल्वे तिकिट १३९ वर कॉल केल्यास करता येईल रद्द

railway
नवी दिल्ली – प्रवासाच्या अगदी थोडावेळ आधी तुम्हाला रेल्वे तिकिट रद्द करायचे आहे आणि तिकिटाची निम्मी रक्कम कपातीची चिंता सातावते आहे, तर तुमची ही समस्या लवकर संपुष्टात येणार आहे. चौकशी हेल्पलाइन क्रमांक १३९ वर फोन करुनही तुम्ही तुमचे कन्फर्म तिकिट रद्द करु शकता आणि नंतर तिकिट खिडकीवरुन तुमचे पैसे मिळवू शकता. नव्यावर्षात प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) ही सुविधा लागू होणार आहे.

यापूर्वी प्रवास सुरु होण्याच्या थोडावेळ आधी तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोहोचणे गरजे होते. असे केले नाही तर तिकिटाचे निम्मे पैसे कापले जात होते. तिकिट रद्द करण्यासाठी नवीन वर्षात नवीन अॅप्लिकेशन सुरु केले जाणार आहे. १३९ वर कॉल करुन तुम्ही तिकिट रद्द करु शकाल. तिकिट रद्द करण्यासाठी तुम्ही कॉल केल्यानंतर तिकिट बुक करताना तुम्ही दिलेला मोबाइल क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल. चौकशी अधिकाऱ्याला ओटीपी क्रमांक सांगावा लागेल. त्यानंतर तिकिट रद्द होईल. यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या तिकिट काऊंटरवर तिकिट दाखवून उर्वरित रक्कम घेऊ शकता.

Leave a Comment