टॉप १० सेलेब्रिटीजचे अलिशान व्हिला

collarge
सेलेब्रिटीज आणि त्यांचे राहणीमान हा नेहमीच सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा आणि मीडियातील चर्चेचा विषय असतो. त्यात हे सेलेब्रिटिज जर हॉलिवूडचे स्टार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार किंवा खेळाडू असतील, तर ही चर्चा आणखीनच रंगतदार होते. अशाच काही स्टार्सच्या आलिशान घरांविषयी….

मॅट डेमॉनचे ‘पॅसिफिक पॅलिसेडस स्टनर‘
1-Matt-Damon--Pacific-Palis
बेस्ट हाउस इन पॅसिफिक पॅलिसेडस अशी ख्याती असलेले घर म्हण्जे मॅट डेमॉन यांचे पॅसिफिक पॅलिसेडस स्टनर. नावाप्रमाणेच हे घर पाहणाराला आश्चर्याने खिळवून ठेवते. २९ हजार चौरस फुटांच्या खाजगी जमिनीवर उभारलेला हा तीन मजली आलिशान महाल ख्यातनाम डिझायनर ग्रँट किर्कपॅट्रिक याने डिझाईन केला आहे. सात बेडरूम्स, १० बाथरूम्स आणि ५ कार गॅरेजेस असलेल्या या घराचे वर्णन गूढ आाणि भुताटकीचा अनुभव देणारे घर असे करण्यात येते. याचे कारण म्हणजे या घरातल्या गायब होणार्‍या काचेच्या भिंती आणि मोठी मोकळी जागा. घरात राहत असूनही मोकळयावर राहिल्याची जाणीव; हे या घराच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे. एक खुले दालन, ३५ फूट उंचीचे महोगनी लाकडाचे सिलिंग आणि एक तरंगता जिना यातून ही जाणीव होत राहते. लक्झरी गेस्ट सुईट, स्पा, जिम, नोकरांसाठीची घरे, एक जपानी धर्तीचा कोई तलाव आणि सुंदर बगीचाही या घरात आहे.

टॉम ब्रॅडी आणि गिसेल बंडकेन यांचे ला इस्टेट”
2-Tom-Brady-and-Gisele-Bund
एक यशस्वी फुटबॉलपटू आणि एक देखणी मॉडेल यांचे घर त्यांच्याइतकेच ग्लॅमरस असणार यात शंका नाही. या जोडप्याचे हे घर जुन्या काळातील युरोपीय मॅन्शनच्या धर्तीवर बांधलेले आहे. सर्जनशीलता आणि आरामदायी रचनेचा संगम असलेल्या या घरात सहा बेडरूम्स आहेत. चुनखडीचा दगड आणि काळ्या दगडांनी बांधलेल्या या घरासाठी सिरॅमिक टाईल्स, विटा आणि संगमरवराचा वापरही करण्यात आला आहे. आतल्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण लाईट फिटिंग्ज, भव्य झुंबरे यांनी वेगळीच वातावरण निर्मिती होते. या घराची खासियत म्हण्जे नैसर्गिक तलावासारखा भासेल असा बनवलेला खास तलाव. शिवाय फळा फुलांची शेकडो झाडे, भाज्या यांनी भरलेला बगीचा, कोंबड्यांचे खुराडे हेही इथे आहे. हे घर बांधताना पर्यावरणाचा विचारही केलेला दिसतो. कित्येक रिसायकल केलेल्या वस्तूंचा वापर त्यासाठी केला आहे. विजेसाठी सोलर पॅनेल्स लावली आहेत. मात्र, या जोडप्याने हे घर नंतर विक्रीसाठी काढले आणि जून २०१४ मध्ये डॉ. ड्रे या रॅपरने ते ४० मिलियन डॉलर्सना खरेदी केले.

“जॉन ट्रॅव्होल्टाचे फ्लाय इन फ्लोरिडा होम”
3-John-Travolta--Fly-In-Flo
प्रसिद्ध अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टाचे फ्लोरिडा इथले घर म्हणजे एक विमानतळच आहे. या घरात २७ हजार ५०० फूट लांबीच्या धावपट्ट्या केवळ त्याच्या खाजगी विमानांसाठी बनवलेल्या आहेत. या धावपट्ट्या थेट त्याच्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत जातात. घराशेजारी त्याच्या विमानांसाठी दोन खास पॅव्हेलियन्सही आहेत. त्याशिवाय या घरातही सहा बेडरूम्स, एक मोठा स्विमिंग पूल, एक गेस्ट हाउस, १६ कार गॅरेजेस, गेम्स टेबल आणि कमानदार खिडक्यांच्या भिंती असलेली एक ग्रेट रूम अशी शाही वैशिष्ट्ये आहेतच.

“टेलर स्विफ्ट याचे ऱ्होड आयलंड ब्यूटी”
4-Taylor-Swift--Rhode-Islan
सुप्रसिद्ध्र कंट्री पॉप स्टार टेलर स्विफ्ट याने गेल्याच वर्षी ऱ्होड आयलंडवरच्या वॉच हिलवर एक आलिशान मॅन्शन विकत घेतला. कोलोनियल शैलीतील या मॅन्शनसाठी त्याने १४ मिलियन डॉलर्स खर्च केले असं म्हणतात. ११ हजार चौरस फुटांच्या या चारमजली घरात आठ बेडरूम्स आहेत. वॉच हिलवरच्या सर्वांत उंच ठिकाणावर असलेले हे समुद्रासमोरचे घर सन १८३० मध्ये बांधलेले आहे. सभोवती समुद्राचे पाणी, ७०० फुटांचा खाजगी बीच आणि अमाप निसर्गसौंदर्य या घराला लाभलेले आहे. घरासमोर पार्किंगसाठी मोठे मोटार कोर्ट, घरात आठ फायरप्लेसेस, खूप मोठे स्वयंपाकघर, एक मोठे करमणुकीचे दालन, दोन बाथरूम्स असलेला मास्टर सुईट अशी या घराची जुन्या काळातली वैशिष्ट्ये आहेत. भरपूर बाल्कनीज, एक मोठा पूल, शेजारी पूल हाउस आणि एक सन रूम हे आणखी वेगळेपण.

“टायगर वूडसचे ज्युपिटर आयलंड कॅसल”
5-Tiger-Woods--Jupiter-Isla
फ्लोरिडातील ज्युपिटर आयलंड वरचे हे ६० मिलियन डॉलर्सचे घर टायगर वूडसच्या मालकीचे आहे. किनाऱ्याच्या आतील बाजूला काही अंतरावर वाहणाऱ्या एका पाण्याच्या प्रवाहापासून ते थेट अटलांटिक महासागरापर्यंत या घराचा पसारा आहे. त्यात टायगर वूडसचे गोल्फचे खाजगी मैदान आहेच, पण अनेक सुखसुविधाही आहेत. जाणीवपूर्वक राखलेलं हिरवंगार गवत, एक १०० फुटी, तर एक ६० फुटी असे दोन तलाव, स्पा, टेनिस आणि बास्केटबॉलचं मैदान अशा सुविधा असलेल्या या घरात आउटडोअर सजावटीवर जास्त भर दिलेला दिसतो. या घराला त्याचं स्वतंत्र खाजगी डॉकयार्डही आहे. एक ऑक्सिजन थेरेपी रूम, एक फिटनेस सेंटर, एक मास्टर सुईट, तीन बेडरूम सुईटस, एक मीडिया रूम, वाईन रूम असलेलं तळघर आणि त्यासाठी स्वतंत्र लिफ्ट अशा हटके गोष्टी या घरात आहेत. एकच काळजी करण्यासारखी बाब म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरचं हे घर हळूहळू खचत चाललं आहे. त्याच्या भिंतींना आाणि दरवाजाच्या चौकटींना तडे जायला लागले आहेत. फ्लोरिडातील मऊ मातीचा हा परिणाम असावा. हे घर वाचवण्यासाठी वूडसने योग्य ती उपाययोजना करायला सुरुवातही केली आहे.

“कोनान ओब्रायनचे पॅसिफिक पॅलिसेडस पॅड”
6-Conan-O’Brien--Pacific-Pa
कोनान ओब्रायन हा अमेरिकन टीव्हीवरील एका टॉक शोचा अत्यंत विनोदी असा सूत्रसंचालक. त्याची लोकप्रियताही कोणा मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. त्याने नुकतेच त्याचे पॅसिफिक पॅलिसेडसमधील महागडे घर विकले. त्याने १९.५ मिलियन डॉलर्सना हे मेगा मॅन्शन विकत घेतले होते. ११ हजार ६०० चौरस फुटांच्या या घरात ६ बेडरूम्स, आठपेक्षा जास्त बाथरूम्स, १० फूट उंचीची सिलिंग आणि ६ फायरप्लेसेस आहेत. घराच्या मागच्या बाजूला असलेला ६० फूट लांबीचा भव्य व्हरांडा आणि त्याचे एका आलिशान स्क्रीनिंग रूममध्ये केलेले रुपांतर ही या मॅन्शनची खसियत. हे घर अत्यंत शाही आणि पॉश आहेच, पण त्याचबरोबर त्यातून दिसणारे सांता मोनिका माउंटन्सपासून पॅसिफिक महासागरापर्यंतचे दृष्य नजर खिळवून ठेवणारे आहे. एक स्विमिंग पूल, स्पा, पूलसाईड पॅव्हेलियन, इनडोअर आणि आउटडोअर किचन्स अशा सुविधाही या घरात आहेत. कोनान ओब्रायनने हल्लीच हे घर विकले, त्यावेळी त्याला चक्क १.५ मिलियन डॉलर्सचा तोटा झाल्याचे सांगितले जाते.

“जॉर्ज क्लूनीचे व्हिला ओलिआंन्ड्रा”
7-George-Clooney--Lake-Como
जॉर्ज क्लूनी हा अनेकांच्या मनावर राज्य करणारा देखणा अभिनेता. त्याचे घरही तसेच देखणे आहे. तेही एका प्रसिद्ध इटालियन सरोवराच्या परिसरात. लेक कोमो या सरोवराच्या सान्निध्यातील या घराचे नाव आहे, व्हिला ओलिआंन्ड्रा. हा २५ खोल्यांचा, ३० मिलियन डॉलर्सचा महाल पाहणाराची नजर खिळवून ठेवेल असाच आहे. हे घर १८ व्या शतकात बांधलेले आाणि जुन्या युरोपियन शैलीतले आहे. भोवती असलेल्या सुरेख बगीच्यांमधील फुलांचे ताटवे, आजूबाजूचा रम्य परिसर यांमुळे या घराला एक वेगळाच परीकथांसारखा माहौल मिळाला आहे. आतल्या बाजूनेही कोरीव काम केलेल्या छतांमुळे हे स्वप्नातले घरच वाटते. घराजवळच्या मुख्य रस्त्यापासून क्लूनीने एक बंदिस्त वॉक वे बांधून घेतला आहे. कोणाच्याही नजरेस न पडता घरापर्यंत पोहचता यावे म्हणून ही सोय केली आहे. या घराचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे क्लूनी आाणि त्याच्या मित्रांना वाटलं, तर ते चक्क लेकमधून पोहत या घरापर्यंत जाऊ शकतात. ओशन १२ या मुव्हीचा काही भाग या घरात शूट करण्यात आला होता.

“रिहानाचा बार्बाडोस व्हिला”
8-Rihanna--Barbados-Villa
स्टार सिंगर रिहाना हिने यश मिळवल्यानंतर आपल्या मातीकडे, आपल्या मुळांकडे परत जाणं पसंत केलं. म्हणूनच तिने तिचं नवं घर बार्बाडोस बेटांवर घेतलं आहे. आपल्या कुटुंबियांच्या जवळ राहता यावं म्हणून वन सॅण्डी लेन रिझॉर्ट या शाही भागात तिने एक २२ मिलियन डॉलर्सचं घर खरेदी केलं आहे. १० हजार चौरस फुटांच्या या घराला खाजगी लिफ्ट आणि अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्थाही आहे. जवळच समुद्रकिनारा, प्रशस्त लॉबी, त्यात एक चक्राकार जिना, स्वतंत्र जिम, समुद्राचा नजारा दाखवणारे अनेक व्हरांडे आणि मोठा स्विमिंग पूल यांमुळे हे घर आणखी शाही बनलं आहे. या टॉपवर आलेल्या गायिकेसाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या घराला असलेली २४ तास सुरक्षाव्यवस्था.

“अविसीचा हॉलिवूड व्हिला “
9-Avicii--Hollywood-Villa
टिम बर्गलिंग असं खरं नाव असलेला फेमस डीजे म्हणजे अविसी. तो याच नावाने तुफान लोकप्रिय आहे. त्याच्या हॉलिवूडमधील सुपरफेमस घराची शान म्हणजे त्याचे मॅक लीन डिझाईन. हे घर हवेत अधांतरी तरंगत असल्याचा भास त्याच्या रचनेतून निर्माण करण्यात आला आहे. हे २ हजार १०० चौरस फुटांचे घर अत्यंत आरामदायक आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या घराला असलेल्या शेकडो आरसेजडित खिडक्यांमधून लॉस एंजेलिस शहराचा रंगीन नजारा पाहता येतो. तज्ज्ञांच्या मते हे घर संगीतकारांसाठी स्वप्नातले घर ठरू शकते. त्यातील स्पेशल प्रकाशयोजना, खिडक्यांची रचना, सिनेमा रूम आणि पूल या घराला आणखी खास बनवतात.

“विल स्मिथ आणि जेडा पिन्केट स्मिथ यांचे सॅलॅबासेस कम्पाउन्ड “
10-Will-Smith-and-Jada-Pink
कॅलिफोर्नियातील कॅलॅबासेस इथे खास डिझाईन करून बांधून घेतलेलं हे गोलाकार घर कोणालाही तासंतास गुंतवून ठेवेल असंच आहे. स्मिथ कुटुंब अनेक क्षेत्रातील प्राविण्यासाठी ओळखलं जातं. त्यांच हे घरही त्यांच्या या व्यक्तिमत्वाची झलक दाखवतं. २० मिलियन डॉलर्सचं हे आलिशान घर स्मिथ कुटुंबाचं ड्रीम हाउस आहे आणि त्यात घराच्या सर्व परंपरागत व्याख्यांना छेद दिलेला दिसतो. हे घर पूर्ण होण्यासाठी सुमारे चार वर्षे लागली होती. यात मोरक्कन, स्पॅनिश आणि पर्शियन शैलींचा समावेश आहे. २५ हजार चौरस फुटांच्या या घरात अत्याधुनिक, सोफिस्टिकेटेड फर्निचर आणि नैसर्गिक मातकट रंग अशा परस्परविरोधी गोष्टींचा मेळ घातला आहे. ९ बेडरूम्सच्या भल्यामोठ्या घरात एक मेडिटेशन रूम, एक स्क्रीनिंग रूम आणि एक रेकॉर्डिंग स्टुडिओही आहे. याच स्टडिओत विल स्मिथचं फेमस गाणं ‘व्हिप माय हेअर‘ रेकॉर्ड केलं गेलं होतं. या हटके घरात एक कृत्रिम तलाव, गॅझेबो, टेनिस आणि बास्केटबॉलचे कोर्टही तयार केलेले आहे. या जोडप्याने हे घर विकायला काढल्याचीही एक बातमी आहे. पण, त्याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

Leave a Comment