जगातील १० सुंदर देश

collarge
माणसांचं जग हे अनेक देशांच्या सीमांमध्ये विभागलेलं आहे. जवळपास 196 देशांच्या सीमांमध्ये विभागलेलं हे जग ही एक मोठी जागा आहे, यात वाद नाही. आता, जगाचा प्रवास सोपा झालेला असताना प्रवास करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वच बाबतीत कोणता देश चांगला, हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. तरीही goodcountry.org या वेबसाईटने जगभरातल्या चांगल्या देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याला गुड कंट्री इंडेक्स असं म्हटलं जातं. या यादीबाबत वाद असले, तरी ही यादी आकडेवारी आणि वस्तुस्थितीवर आधारलेली आहे. यात समाविष्ट केलेल्या देशांचा चांगुलपणा हा अनेक घटकांवर ठरवला गेला आहे. पृथ्वी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी होणारे प्रयत्न, समृद्धी आणि समानता, जागतिक शांततेसाठी दिलं जाणारं योगदान आणि शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगती असे हे घटक आहेत. या यादीतील देश आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर ही एक नजर…..

आयर्लंड
1-ireland
जगातील क्रमांक एकचा चांगला देश म्हणून नेहमीच आयर्लंडला पसंती दिली जाते. याबाबत हा देश अव्वल स्थानावर आहेच, पण त्याचबरोबर एकूण समृद्धी आणि सामाजिक समानता या घटकामध्ये तो निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे. वास्तविक हा देश सध्या कंबरडे मोडणाऱ्या मंदीच्या अवस्थेतून बाहेर येत आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यापारातील नीतिमत्तेला झुकते माप देतो. या देशातील संयुक्त राष्ट्र स्वयंसेवकांचे परदेशातील प्रमाण लक्षणीय आहे. संस्कृती, जगातील क्रमवारी, आरोग्य आणि जीवनमान अशा अनेक बाबतीत हा देश अग्रेसर आहे. तरीही कोणताही देश सर्वच बाबतीत परिपूर्ण असू शकत नाही. आयर्लंडवरही या देशातील लैंगिक समानतेच्या संदर्भातील विचारसरणीवरून टीका होत आली आहे. या देशातील कट्टर कॅथॉलिक समाजव्यवस्थेमुळे हा देशसमान नागरी हक्कांच्या प्रगतीबाबत इतर अनेक युरोपीय देशांच्या तुलनेत मागे राहतो.

फिनलँड
2-finland
उत्तर युरोपातील हा एक आकाराने चिमुकला देश असून, जगातील सर्वोत्कृष्ट देशांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. जगावर आणि स्थानिक गोष्टींवर अनेक प्रकारे परिणाम करणारा हा देश उत्तम देशांच्या निकषांमध्ये दोन गोष्टींत अग्रेसर असल्याचे दिसते. प्रगत शास्त्र व तंत्रज्ञान, आणि समृद्धी हे ते दोन घटक. हा देश उद्यमशील तर आहेच, त्याचबरोबर जगात एकता आणि चांगले वातावरण प्रस्थापित व्हावे यासाठीही हा देश प्रयत्न करत असतो. शिक्षण आणि ज्ञान याबाबत बोलायचे झाल्यास फिनलँडमधील अनेक प्रतिभावंतांनी मोठ्या संख्येने नोबेल पारितोषिके मिळवली आहेत. या देशात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशने आहेत आणि इथून अनेक जर्नल्सही प्रकाशित होत असतात.

“स्वित्झर्लंड”
3-Switzerland
जगभरात विख्यात असलेली स्विस आल्प्सची पर्वतराजी या देशाला या यादीत तिसरे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली आहे. समृद्धी आणि समानता, शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगती, जगातील क्रमवारी, आरोग्य आणि जीवनमान अशा घटकांमधील उत्तमतेने या देशाने या यादीत स्थान मिळवलं आहे. शांतता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत या देशाचा जगात ७१ वा क्रमांक लागतो. जागतिक राजकारणाबाबत हा देश नेहमीच तटस्थ राहत आलेला आहे. याबाबत काहीसा खाली गेलेला क्रमांक इतर अनेक घटकांमधील प्रगतीने भरून काढण्यात स्वित्झर्लंडने यश मिळवलं आहे. खुले व्यापारी धोरण, परकीय गुंतवणुकीच्या संधी आणि फेअर ट्रेड मार्केट अशा अनेक बाबी या देशाला एक आदर्श देश बनवण्यास हातभर लावतात.

“नेदरलँडस”
4 netherland
सततचे ट्रॅफिक जाम आणि एकूणच काहीशी संथ व्यवस्था अशा काही नकारात्मक गोष्टींसाठी नेदरलँड ओळखले जात असले, तरी या देशात इतर अनेक उत्तम गोष्टीही आहेत. संस्कृती, जगातील क्रमवारी, समृद्धी आणि सामाजिक समानता, आरोग्य आणि जीवनमान अशा अनेक बाबींमुळे या देशाने सर्वोत्तम दहा देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे जगावर सकारात्मक ठसा उमटवण्याच्या दिशेने हा देश वाटचाल करत आहे, असे म्हणता येते. हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत हा देश अग्रेसर आहे. म्हणजेच जगापासून लपवण्यासारखे या देशाकडे काही नाही आणि त्याचमुळे या लहानशा देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा आत्मविश्वास कमावला आहे.

“न्यूझीलंड “
5-New-Zealand
उत्तम देशांसाठी असलेल्या निकषांमध्ये न्यूझीलंउ हा देश दोन बाबतीत अव्वल आहे. त्यात पृथ्वी आणि पर्यावरणाचक रक्षण आणि शास्त्रीय व तांत्रिक प्रगती हे घटक येतात. या देशाचे नागरीक बाहेर ‘किवीज’ या नावाने ओळखले जातात. जैवसंसाधनांचे साठे आणि कार्बन उत्सर्जनाविषयी जागरुकता या दोन गोष्टींमध्येही हा देश बाजी मारतो. दक्षिण गोलार्धातील या देशात अनेक लोक पर्यावरणाचा विचार करून इको फ्रेडली घरांमध्ये राहतात. घरासाठी वस्तू विकत घेतानाही देशाच्या शासनाने प्रमाणित केलेले पर्यावरणाच्या सुरक्षिततेची हमी देणारे एन्व्हायर्नमेंटल चॉईस न्यूझीलंड इको लेबल पाहूनच खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. आपल्यामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी, याची काळजी ते घेताना दिसतात.

“स्वीडन”
6-sweden
इकिआ हे फेमस हाउसिंग स्टोअर, स्विस चॉकोलेटस आणि अॅबसोल्यूट व्होडका अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेला हा देश आहे. सर्वांत चांगल्या देशांच्या सर्वच निकषांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याचे रेकॉर्डही या देशाच्या नावावर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जागतिक क्रमवारी, भरभराट आणि समानता, त्याचबरोबर आरोग्य आणि राहणीमान या निकषांमध्ये या देशाने १० वा किंवा त्यावरचा क्रमांक राखलेला आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आईसलँड आणि कॅनडा यांच्या पाठोपाठ या देशाचा तिसरा क्रमांक लागतो. जैवसंसाधनांचे साठे, कार्बन उत्सर्जन आणि इतर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाबाबत असलेल्या जागरुकतेसाठीही हा देश नावाजला जातो.

“युनायटेड किंगडम”
7-united-kingdom
जगातील जवळपास प्रत्येकालाच कुतूहल वाटणाऱ्या रॉयल फॅमिलीचा देश म्हणजे इंग्लंड. सध्या महाराणी एलिझाबेथ दुसरी हिच्या अधिपत्याखाली असलेला हा देश गुड कंट्री इंडेक्सच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारी, भरभराट आणि समानता, आरोग्य आणि राहणीमान या घटकांमुळे हा देश या यादीत समाविष्ट होत असला, तरी सायन्स अँड टेक्नॉलॉजीबाबत त्याला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. जर्नल्स प्रकाशित करणे, आंतरराष्ट्रीय प्रकाशने आणि नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत हा देशांचा समूह उत्तम कामगिरी करत आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही त्याची कामगिरी चांगली आहे. त्यामुळेच या शक्तीशाली राष्ट्रांच्या संघटनेला या यादीत स्थान मिळणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

“नॉर्वे”
8-norway
चित्रातल्यासारखा निसर्ग आणि रेखीव सुंदर शहरे असणारा नॉर्वे हा देश गुड कंट्री इंडेक्समध्ये आठव्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारी आणि पर्यावरण संरक्षण या दोनच घटकांमधील कामगिरीच्या आधारे या देशाने हे स्थान मिळवले असले, तरी त्याचा जगावर होणारा परिणाम लक्षणीय आहे. दान आणि सामाजिक कार्य, निर्वासितांना आधार देणे आणि संयुक्त राष्ट्रांबरोबरचे करार यांच्यामुळेही या देशाच्या खात्यात चांगले गुण जमा झाले आहेत. या सर्वांमुळे जगाची एकता आणि शांतता हे घटक नॉर्वेसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर या देशाकडे असलेली अफाट संपत्ती ते केवळ स्वत:साठी वापरत नाहीत, हेही दिसून येते.

“डेन्मार्क”
9-denmark
टिपिकल युरापियन निसर्गसौंदयर्रने नटलेल्या डेन्मार्क देशाने संस्कृती, जागतिक क्रमवारी आणि आरोग्य या निकषांवर या यादीत स्थान मिळवले आहे. औषधांची निर्यात, अन्नधान्याची मदत, मानवतेच्या दृष्टिकोनातून केली जाणरी मदत आणि दान, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेला केली जाणारी भरघोस आर्थिक मदत आणि स्वयंसेवी काम यामध्ये हा देश नेहमीच अग्रेसर असतो. डेन्मार्क हा देश जगभरात त्याच्या औदार्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे हा देश सर्वांत चांगल्या देशांच्या यादीत आला आहे, यात नवल नाही. या यादीतील आकाराने सर्वांत लहान देशांपैकी एक असूनही डेन्मार्कच्या सकारात्मकतेचा जगावर पडणारा प्रभाव मोठा आहे.

“बेल्जिअम”
10-belgium
गुड कंट्री इंडेक्समध्ये नाव येण्यासाठी बेल्जिअम या देशाच्या खात्यात काही महत्त्वाची आकडेवारी आहे. भरभराट आणि समानता, आरोग्य आणि राहणीमान या घटकांच्या आधारे या देशाने हे स्थान मिळवले असले, तरी संस्कृतीच्या बाबतीत त्याने राखलेला पहिला क्रमांक त्याला या यादीत कायम ठेवण्यास सहायक ठरला आहे. कलात्मक वस्तूंची निर्यात, कलात्मक आणि सर्जनशील सेवा सुविधा, हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य आणि माध्यमांचं स्वातंत्र्य या बाबीही या देशाला आणखी उत्तम बनवतात. या सकारात्मक गुणांमुळे या लहानशा देशाने या यादीत स्थान मिळवलं आहे आणि इतर छोट्या देशांसाठी एक आदर्शही उभा केला आहे.

Leave a Comment