चीनी कंपनीने आणला १०,००० एमएएच बॅटरीचा स्मार्टफोन

smartfon
चीनी स्मार्टफोन कंपनी आकिटेलने तब्बल १० हजार एमएएच बॅटरीचा स्नार्टफोन बाजारात आणला असून ही बॅटरी आयफोन सिक्स प्लसचे तीन हँडसेट चार्ज करू शकते असा दावा केला आहे. अमेरिकेत त्याचे प्री ऑर्डर बुकींग ई कॉमर्स वेबसाईटवर सुरू झाले आहे. त्याची किंमत २३९ डॉलर्स म्हणजे अंदाजे १६ हजार रूपये आहे. २१ जानेवारी २०१६ पासून त्याचे शिपिंग सुरू होत आहे. अकीटेल के १०,००० या नावाने तो आला आहे.

हा फोन रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट सपोर्ट करतो. म्हणजेच त्याचा वापर पॉवरबँकेप्रमाणे करता येतो. या फोनसाठी ५.५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, अँड्राईड ५.१ लॉलीपॉप, ड्युअल सिम, दोन्ही सिम फोरजी एलटीई सपोर्ट करणारी, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सोय, ८ एमपीचा ऑटोफोकस रियर तर २ एम.पी.चा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment