जगातील सर्वांत क्रूर हुकूमशहा

[nextpage title=”जगातील सर्वांत क्रूर हुकूमशहा”]
collarge
जगातील सर्वांत क्रूर हुकूमशहा कोण असं विचारलं, तर बहुतेक जण हिटलर, स्टॅलिन किंवा मुसोलिनीचं नाव घेतील. लाखो लोकांना यातना देणारे आणि मरणाच्या खाईत लोटणारे आणखीही काही राज्यकर्ते आहेत. इतिहासातील हुकूमशहांच्या जागी तसेच नवे हुकूमशहाही नव्याने उदयाला आले आहेत. विषुववृत्ताजवळच्या गिनिआ या देशातील तेओदोरो ओबिआंग न्गुएमा हा राजा अशा क्रूरपणाचं टोकाचं उदराहरण आहे. या राजाने आपल्या विरोघ्कांना नुसतं ठार केलं नाही, तर त्यांचे मृतदेह खाल्ले. मानवाचा आतापर्यंतचा इतिहास सततची युद्धे आणि क्रौर्यानेच भरलेला आहे. त्यात या सत्तांध राज्यकर्त्यांचा क्रमांक सर्वांत वरचा लागतो. हे सर्वचजण् एकसारखेच निर्दयी आणि मानवतेला कलंक म्हणावेत असे आहेत.

झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे
1-Robert-Mugabe
रॉबर्ट मुगाबे हे 1987 साली बनलेले झिंबाब्वेचे पहिले आणि आजवरचे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत. गेल्या तीन दशकांपूक्षा अधिक काळ त्यांनी या देशाला आपल्या भ्रष्ट आणि निरंकुश सत्तेच्या वरवंट्याखाली ठेवले आहे. परिणामी आज हा देश कंगाल आाणि कर्जबाजारी झाला आहे. महागाई कल्पनेपलिकडची आहे. देशाची आरोग्यव्यवस्था कोलमडलेली आहे. झिंबाब्वेचे लाखो नागरिक उपासमारीला बळी पडत आहेत. बेकारीचा प्रश्‍नही उग्र आहे. या देशात कोणीही आपली मते मोकळेपणाने मांडू शकत नाही. मुगाबेंची सत्ता त्यांच्या क्रूर आणि वांशिक द्वेषाच्या नीतीवर आधारलेली आहे. त्यांच्याविरोधात जाणरांना लगेच कठोर शिक्षा केली जाते. माताबेलेलँण्ड इथे 20,000 हून अधिक लोकांची करण्यात आलेली हत्या आणि सन 2000 मध्ये आणलेला भूसंपादन कायदा ही दोन पापे मुगाबेंच्या नावावर जमा आहेत. या कायद्याने लाखे लोकांना बेघर करून देशोधडीला लावले आहे. मुगाबेंच्या कारकिर्दीत देशातील भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, त्यांच्या व्यक्तिगत संपत्तीत अमाप भर पडली.[nextpage title=”सुदानचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल बशीर “]

2-omar-al-bashir
सुदानमध्ये 1989 मध्ये रक्ताचा थेंबही न सांडता सैन्याचा उठाव झाला आणि त्यातून सत्तांतर घडून आले. त्यावेळी ओमर अल बशीर हे सुदानचे राष्ट्राध्यक्ष बनले. मात्र, त्यानंतर या राज्यकर्त्याची संपूर्ण् कारकीर्द रक्तरंजित ठरली. सुदानचा आतापर्यंतचा सर्वांत क्रूर हुकूमशहा असा लौकिक त्याने मिळवला. आधी सुदानमधील दुसरे सिव्हिल वॉर घडून आले. हे युद्ध तब्बल 22 वर्षे सुरू होते आणि त्यात लाखो लोकांचा बळी गेला. त्यात दुष्काळआणि अवर्षणाचीही भर पडली. त्यानंतर दारफुर येथे झालेल्या वांष्कि कत्तलीत हजारो लोक मारले गेले आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक जणांवर परागंदा होण्याची वेळ आली. त्यानंतर ओमरने आपल्या जुलमी राजवटीत उत्तर सुदानमध्ये ष्रियतचा कायदा अमलात आणला. देशाची संसद बरखास्त केली. राजकीय पक्ष आणि व्यापारी संधटनांवर बंदी घातली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आणि अनेक जाचक कायदे आणि शिक्षा लागू केल्या. संयुक्त राष्ट्रसंघाने ओमरच्या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉरंट जारी केले आहे. त्याच्या अत्याचाराला बळी पडलेली प्रत्येक व्यक्ती त्यासाठी प्रार्थना करत आहे.[nextpage title=”सिरियाचा बशर अल असद”]

3-bashar-al-asad
एकेकाळी व्यवसायाने डोळ्यांचा डॉक्टर असलेला बशर अल असद पुढे सिरियाचा हुकूमशहा बनला. या देशात गेली काही वर्शे सातत्याने सुरू असलेला हिंसाचार आणि अस्थिरता याचं एक कारण म्हण्जे हा क्रूरकर्मा राज्यकर्ता. त्याचे वडील हे असेच भयंकर राज्यकर्ते होेते. बशरने त्यांच्याकडून 2000 साली सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी परिस्थिती बदलेल, सुधारेल अशी लोकांना आशा होती. परंतु बशरने आपल्या वडिलांचाच वारसा चालवला आणि हळूहळू सिरियातील परिस्थिती अधिकाघिक गंभीर बनत हा देश सिव्हिल वॉरच्या खाईत ढकलला गेला.केणताही विरोध मोडून काढण्यासाठी बळाचा अतिरिक्त वापर, टोकाचा धार्मिक आणि वांशिक विद्वेष आणि युद्धखोरीची आवड ही याच्या कारकिर्दीची काळी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. 2015 या एकाच वर्षात आतापर्यंत 10,000 हून जास्त सिरियन नागरिक हिंसाचाराला बळी पडले आहेत. युद्धात आजवर दोन लाखांहून जास्त लोकांचा बळी गेला आहे, तर कित्येक लाख लोकांनी देश सोडून युरोपात पळ काढला आहे.फ्रान्न्स, संयुक्त राष्ट्रे यांच्यासह अनेक देशांनी बशरवर युद्धखोरी आणि मानवतेविरूद्ध अपराधांसाठी खटले भरले आहेत.[nextpage title=”उझबेकिस्तानचे इस्लाम कारिमोव्ह “]

4-Islam-Karimov
सन 1991 मध्ये झालेल्या सोव्हिएत राश्ट्रसंघाच्या पाडावानंतर इस्लाम कारिमोव्ह हे उझबेकिस्तानचे एकमेव सत्ताधीश आहेत. आतापर्यंत त्यांच्या सत्ताकाळात तिथे मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन झालेले आहे, असे म्हणता येईल. इस्लाम कारिमोव्ह यांनी दोन दशकांहून अधिक काळ अत्यंत निर्दयी पद्धतीने सत्ता राबवली आहे. मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची सतत गळचेपी करणारा देश अशी या काळात उझबेकिस्तानची ख्याती झाली. नागरिकांना या काळात अनन्वित छळ, सामूहिक हत्याकांड, बलात्कार, भ्रष्टाचार, दहा हजारांहून अधिक विरोधकांना कारावास असे अनेक अत्याचार सहन करावे लागले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या दहशतीच्या जोरावर कारिमोव्ह यांनी पुन्हा एक निवडणूक जिंकून पुढची पाच वर्शे सत्ता राखली आहे. ही निवडणूक वैध मार्गाने जिंकली गेली असल्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे या देशातील अमानुष सत्तेचे दुष्टचक्र इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत.[nextpage title=”क्युबाचे राउल कॅस्ट्रो “]

5-raul-castro
क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी वयोवृद्ध झाल्यावर सत्तेची जबाबदारी राउल कॅस्ट्रो या आपल्या लहान भावाकडे सोपवली. त्यामुळे सत्ता कुटुंबातच राहिल, हा हेतू होता. फिडेल यांच्या काळातच क्युबामध्ये वर्तमानपत्रांना, माध्यमांना काही बोलण्याची मुभा नव्हती. दडपशााहीचे धोरण अवलंबले जात होते. राजकीय विरोधकांना ते नामशेष होईपर्यंत तुरूंगात टाकले जात असे. त्यामुळे सत्ता राउल यांच्या हाती गेल्यानंतर लोकांना हायसे वाटले होते. परंतु हा बदल त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवणारा ठरला. राउल यांनीही आपल्या थोरल्या भावाची जुलमी सत्ता तशीच पुढे राबवली. उलट तो जास्तच कर्दनकाळ ठरला. आता मात्र क्युबातील जनतेला आशेचा नवा किरण दिसत आहे. कारण, 2018 मध्ये होणरी निवडणूक न लढवण्याचा निर्णय राउल यांनी जाहीर केला आहे.[nextpage title=”युरोपचा अखेरचा हुकूमशहा बेलारूसचा अलेक्सांद्र ल्युकाशेन्को”]

6-Alexander-Lukashenko
सन 1994 मध्ये निवडून आल्यानंतर बेलारूसची सत्ता हातात आलेला अलेक्सांद्र ल्युकाशेन्को याने एक क्रूाकर्मा शासक म्हणून दहशत निर्माण केली. सत्तेवर येताच त्याने सर्वप्रथम लोकशाही शासनपद्धती बंद केली. माध्यमांची गळचेपी केली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. सर्व राजकीय विरोधकांना दंडेलशाहीच्या मार्गाने गप्प करण्यात आले आणि देशाची संसद बरखास्त केली गेली. अलेक्सांद हा एक बुरसटलेल्या विचारसरणीचा माणूस होता आणि आपले तेच खरे करण्याची त्याची प्रवृत्ती होती. युरोपमध्ये काही मोजक्याच देशांमध्ये आजही देहदंडाची शिक्षा दिली जाते. बेलारूस हा त्यापैकी एक आहे. अलेक्सांद्रच्या मते हिटलर हा तितकासा वाईट माणूस नव्हता. त्याच्या या विचारात त्याची मनोवृत्ती दिसते. त्याच्या राजवटीला कंटाळलेल्ज्या लोकांनीच त्याला युरोपचा अखेरचा हुकूमशहा असे नाव दिले आहे.[nextpage title=”आफ्रिकेतील सर्वांत भयंकर राज्यकर्ता : एट्रिआचा इसाइआस अ‍ॅफेवर्की “]

7-Isaias-Afwerki
एर्ट्रिआ हा आफ्रिकेतील सर्वांत जास्त दडपलेला आणि जगापासून दूर, बंदिस्त असा देश मानला जातो. य देशात कदाचित मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन होत असावे कदाचित उत्तर कोरियातील स्थितीही त्यापेक्षा चांगली असेल, असे समजले जाते. इसाइआस अ‍ॅफेवर्की हा या देशाचा आतापर्यंतचा एकमेव सत्ताधीश राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्याच जुलमांचा परिणाम म्हणजे एर्ट्रिआतील भयंकर परिस्थिती. इसाइआसच्या एकछत्री आणि निरंकुश सत्तेमुळे तेथील जनतेला सततचा छळ, कत्तलीच्या घटना, अराजक, बलात्कार आणि वेठबिगार यांचा सामना करावा लागतो. तेथेही माध्यमांना स्वातंत्र्य नाही. लोक पराकोटीच्या दारिद्र्यात आणि भीषण टंचाईत जगत आहेत. सत्तेच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज कारावास किंवा मृत्यूदंडाने दडपला जातो. इसाइआस अ‍ॅफेवर्की आणि त्याची एर्ट्रिआतील राजवट यांच्यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेविरोधातील गुन्ह्यांबाबत नजर ठेवली जात आहे. त्यातून भविष्यात काही चांगले घडू शकेल अशी आशा आहे.[nextpage title=”स्वाझिलँण्डचा रंगेल राजा : मस्वाती तिसरा “]

8-mswati-III
राजा मस्वाती तिसरा हा स्वाझिलँड या लहानशा देशाचा सर्वसत्ताधारी राजा आहे. त्याच्या रंगेलपणाचे किस्से प्रसिद्ध आहेत. तो वारसाहक्काने वयाच्या 14व्या वर्षी गादीवर आला. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्याला राज्यकाराभारात त्याची आई मदत करत असे. त्यानंतर तो स्वतंत्रपणे कारभार करू लागला. अतिशय विलासी आणि श्रीमंती थाटाचे आयुष्य जगणार्‍या या राजाची प्रजा मात्र अतिशय हलाखीत जगते आहे. मस्वाती तिसरा याने देशातील लोकशाही मोडीत काढली आणि स्वाझिलँण्ड हा देश एक रक्तरंजित आणि जुलुमाने पछाडलेला देश बनला. त्याच्या राजवटीत स्वाझिलँण्ड हा एडसने सर्वाधिक ग्रासलेला देश बनला. त्याने स्वत: 14 अल्पवयीन मुलींशी विवाह केला. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले. एचआयव्हीला आळा घालण्यासाठी त्याने 18 वर्षांच्या आतील मुलींवर अनेक बंधने लादली, परंतु स्वत:च केवळ एका गायीच्या मोबदल्यात एका 13 वर्षांच्या मुलीशी विवाह केला.[nextpage title=”इक्वाटोरियल गिनिआ या देशाचा तेओदोरेा ओबिआंग न्गुएमा”]

9-Teodoro-Obiang-Nguema-Mba
गेम ऑफ थ्रोनस या प्रसिद्ध चित्रपटातील घटनाक्रमाशी या देशातील सत्तेच्या कथेचे साम्य दिसून येते. न्गुएमा याचे काका आधी इक्वाटोरियल गिनिआचे राज्यकर्ते होते. त्यांची राजवटही अतिशय क्रूर आणि जुलमी ठरली. परिणामी न्गुएमाच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या होण्याची वेळ आली. त्यावेळी न्गुएमाने सैनिकांचा उठाव घडवून आणला आणि आपल्या काकांना सत्तेपासून दूर केले. स्वत: सत्ता हातात घेण्यापूर्वी आपण काकांपेक्षा चांगले राज्यकर्ते बनू असा विश्‍वास त्याने जनतेला दिला होता. प्रत्यक्षात मात्र तो जास्त भयावह ठरला. न्गुएमाची राजवट ही जगातील सर्वांत हिंसक, अत्याचारी आणि कठोर राजवट ठरली. या देशात नैसर्गिक तेल आाणि वायूचे समृद्ध साठे असूनही इथी जनता मात्र, गरिबीत जगते आहे. राजा न्गुएमा आणि मूठभर श्रीमंतांच्या हातात सर्व संपत्ती आहे. असे असूनही सर्व बळाचा वापर करत न्गुएमा प्रत्येक निवडणूक 90 टक्के मतांनपी जिंकत आला आहे. त्यामुळे त्याची सत्ता हटण्याची चिन्हे नाहीत. न्गुएमाच्या बाबतीतली सर्वांत भयंकर गोष्ट म्हणजे तो आपल्या शत्रूंच्या शरीराचे ठराविक अवयव खातो, असा प्रवाद आहे. त्यांची शक्ती आपल्याला मिळावी यासाठी तो हे करतो, असे सांगितले जाते.[nextpage title=”उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग युन”]

10 kim-jong-un
किम जोंग दुसरा याचा उत्तराधिकारी असलेला हा उत्तर कोरियाचा हुकूमशहा म्हणजे किम जोंग युन. याची राजवट तुलनेने नवी असली, तरी त्याच्या दडपशाहीचे किस्से जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यालाही लोकांवर जुलूम करण्याची आवड परंपरेने मिळाली असल्याचे दिसते. किम जोंग युन हा उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा बनला, त्यावेळी तो आपल्या वडिलांची परंपरा मोडून काढेल अशी अंधुक आशा लोकांना होती. परंतु, ती फोल ठरली. त्याने आपल्या वडिलांपेक्षाही जास्त अत्याचार करायला सुरुवात केली. त्याने जगासमोर आण्विक शस्त्रांचा बागुलबुवाही उभा केला आहे. हा हुकूमशहा अद्याप तरुण आहे आणि त्याच्याकडे राज्य करायला भरपूर वेळ आहे. त्याने आपल्या राजवटीची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे आणि ती फारशी आशादायक नाही.

Leave a Comment