हृषिकेश – उत्तराखंडातील तीर्थनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले व बिटल्स ग्रुपच्या आठवणींशी जोडले गेलेले महर्षी महेश योगी यांचे तपश्वर्या स्थळ शंकराचार्य नगर उर्फ ८४ कुटीर पर्यटकांसाठी खुले केले गेले आहे .त्याचे लोकार्पण वनमंत्री दिनेश अग्रवाल व परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वतीमुनी महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे ध्यानयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्थळाचा अनुभव पर्यटकही जवळून घेऊ शकणार आहेत. येथे भेट देताना पर्यटकांना नेचर ट्रेलचा अनूभवही मिळणार आहे.
महर्षी महेश योगींचे ८४ कुटीर पर्यटकांसाठी खुले
हृषिकेशपासून सात किमीवर पहाडात असलेल्या या स्थळावर वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या ८४ गुंफा अथवा कुटिरे आहेत. निसर्ग संपदा हाच मुख्य आधार मानणार्या महेश योगी यांनी जगभरात ध्यान योगाचा प्रसार केला आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. तीर्थनगरी या नावानेही हे स्थळ ओळखले जाते.याच आश्रमात जगप्रसिद्ध बॅड बीटल्सचे पॉल मॅकार्ना, जॉन लेनेन, हॅरिवन व रिंगो स्टार येऊन राहिले होते व येथेच त्यांनी मेडिटेशनचे धडे घेताना सुमधूर अशी ८४ गाणी लिहिली होती. तेव्हापासून हा बिटल्स आश्रम या नावानेही ओळखला जातो.
८० च्या दशकात येथे पर्यटकांना जाता येत होते मात्र हा भाग राजाजी नॅशनल पार्कचा भाग बनल्यामुळे वनखात्याच्या अखत्यारीत गेला व त्यानंतर येथे जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली होती. याला हेरिटेज वारसा दर्जा देण्यात येणार असल्याचेही समजते.