जानेवारीत भारतात येणार ‘मोटो एक्स फोर्स’

moto-x
मुंबई: भारतात लाँच होण्याच्या तयारीत मोटोरोलाचा मोटो जी टर्बो असतानाच जानेवारी २०१६ला मोटो एक्स फोर्स हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याचे मोटोरोला इंडियाचे जनरल मॅनेजर अमित बोनी यांनी जाहीर केले आहे.मोटो एक्स फोर्स सध्या अमेरिकेत उपलब्ध असून याची खासियत डिस्प्ले शटर प्रूफ ग्लास ही आहे.

मोटो एक्स फोर्सचे फीचर्स:
याचा डिस्प्ले ५.४ इंच क्यूएचडी असून त्याचे रेझ्युलेशन १४४०×२५६० पिक्सल आहे. याचा डिस्प्ले शटर प्रूफ ग्लास आहे. अॅल्युमिनियम रिजिड कोअर आणि प्रोसेसर २ गीगीहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा कोअरचा आहे. या ३ जीबी रॅम तसेच ३२ जीबी, ६४ जीबी वेरिएंट देखील हा फोन उपलब्ध होणार आहे. याचा रिअर कॅमेरा २१ मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. २ टीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड सपोर्ट करते.

Leave a Comment