काळ्या पैशाबाबत सरकार भरकटलेले: मोहनदास पै

tv-mohandas-pai
हैदराबाद: विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे कोणतेही निश्चित धोरण आणि क्षमता नसल्याने केंद्र सरकार या बाबत भरकटलेल्या अवस्थेत आहे; अशी टीका इन्फोसिसचे माजी संचालक आणि प्रत्यक्ष कर सुधारणा समितीचे माजी सदस्य टी व्ही मोहनदास पै यांनी केली. या बाबतीत भारतातील कायदे सक्षम नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मोठ्या घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि काळा पैसा विदेशात दडविणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण नाही आणि ते करण्याएवढी गुप्तचर यंत्रणांची क्षमताही नाही. त्यामुळे विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा हास्यास्पद झाला आहे; अशा शब्दात पै यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.

‘तुम्ही काळ्या पैशाची चौकशी करण्याची वाट विदेशी बँका वाट पाहतील. तुम्ही गेल्यावर त्याची माहितीही देतील आणि पैसेही परत करतील; इतके ते काम सोपे नाही; असे सांगत पै यांनी सरकारची खिल्लीच उडविली. त्यासाठी सजग अशी माहिती मिळविण्याची, कारवाई करण्याची यंत्रणा आणि खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालये विकसित करण्याची आवश्यकता आहे; असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment