एसबीआयच्या सेवा नवीन वर्षात होणार महाग

sbi
नवी दिल्ली : नवीन वर्षापासून आपल्या सेवा देशाची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक महाग करणार असून १ जानेवारी २०१६ पासून या सेवा महाग होणार आहेत. बँकेमध्ये लॉकरसह बँक खात्याच्या देखभालीच्या सेवा महाग होतील. तसेच सोबत दुचाकी कर्ज, वाहनकर्ज, गृहकर्ज, बिल कलेक्शनवर लागणाऱया सेवा शुल्कात वाढ करण्याची तयारी सुरू आहे.

बँक नवीन वर्षापासून लॉकरचे भाडे, चालू खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवणाऱयांवर लागणारे शुल्क, खाते बंद करताना लागणारे शुल्क, गृह कर्ज तसेच इतर अन्य सेवांच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एसबीआयच्या ग्राहकांना नवीन वर्षात विविध सेवांसाठी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे.

Leave a Comment