नवीन वर्ष करणार सुट्ट्यांची बरसात

holidays
मुंबई- यंदाच्या वर्षात पावसाने देशभरातच तुरळक हजेरी लावली असली तरी आगामी वर्षात सुट्ट्यांचा पाऊस तरी नक्कीच पडणार आहे. नवीन वर्षात म्हणजे २०१६ मध्ये सहा मोठे विकएंड, दिवाळीचा बंपर ब्रेक अशी बरसात होत आहे. त्याची सुरवातच १ जानेवारीपासून होत आहे. नवीन कॅलेंडरप्रमाणे यंदाच्या वर्षातले बहुतेक मोठे सण शुक्रवार अथवा सोमवारी येत आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा असलेल्या पगारदारांना यंदा सुट्ट्यांची चैन करता येणार आहे.

यंदा १ जानेवारीला शुक्रवार आहे. हा पहिला मोठा विकएंड असेलच पण मार्च,एप्रिल, आक्टोबरमध्ये पगारदारांना बंपर हॉलीडे मिळणार आहेत. मार्चमध्ये शिवजयंती, होळी, महाशिवरात्र, गुड फ्रायडे या सुट्टया शुक्रवार आणि सोमवारला जोडून आल्या आहेत. एप्रिलमध्ये आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढी पाडवा या सुट्याही जोडून आल्या आहेत. दिवाळीतही अशाच सुट्टया जोडून आल्याने सलग सुटी मिळणार आहे. गणेश चतुर्थीही सोमवारी आली आहे. कॅलेंडर पाहिलेल्या लोकांनी आत्तापासूनच पुढील वर्षातील सुट्टांसाठी बेत बनवायला सुरवात केली असल्याचेही समजते.

Leave a Comment