नववर्षात महागणार ह्युंदाय, टोयोटाच्या गाड्या

toyota
नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मोटार खरेदीची योजना आखत असाल तर नक्कीच ती काहीशी महाग ठरणार आहे. १ जानेवारीपासून आपल्या मोटारींची भाववाढ करण्याची घोषणा ह्युंदाय मोटर इंडिया आणि टोयोटा या आघाडीच्या मोटार उत्पादकांनी केली आहे. ३० हजार रुपयांपर्यंत ह्युंदायने, तर ३ टक्क्यांपर्यंत टोयोटाने भाववाढ जाहीर केली आहे.

इतरही कंपन्या या कंपन्यांच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. या भाववाढीसाठी चलन विनिमयातील चढउतार आणि त्यामुळे कच्च्या मालावरील वाढता खर्च यांना या दोन्ही मोटार उत्पादक कंपन्यांनी जबाबदार धरले आहे.

देशात उपलब्ध सर्व वाहनांवरही भाववाढ लागू होणार आहे. ह्युंदायकडून देशात ९ मोटारींची विक्री केली जात आहे. ज्यांची किंमत ३.१० लाख ते ३०.४१ लाख रुपयांपर्यंत आहे. याआधी जर्मनीच्या मर्सिडिझ बेन्झ आणि बीएमडब्ल्यू यांनीही भाववाढ जाहीर केली आहे.

Leave a Comment