बॅटरी बॅकअप वाढविणारी स्मार्ट बॅटरी केस

smart-battery
अॅपलने त्यांच्या आयफोन सिक्स एस व सिक्स एस प्लस या दोन मॉडेल्ससाठी नवीन स्मार्टबॅटरी केस लाँच केली आहे. ही केस बॅटरी लाईफ २५ तासांनी वाढवेल असा दावा कंपनीने केला आहे. या केसमध्ये १ बॅटरी पॅक दिला गेला आहे. काळ्या आणि पांढर्‍या रंगात ही केस उपलब्ध असून ती यूएस आणि युकेमध्ये मंगळवारपासून ९९ डॉलर्समध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे.

सॉफ्ट टच सिलीकॉन व मायक्रोफायबर मटेरियलपासून ही केस बनविली गेली आहे. वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार युजरला फोनची बॅटरी किती शिल्लक आहे हे फोनच्या नोटिफिकेशन सेंटरमध्येही पाहता येणार आहे. लॉक स्क्रीनवरतीही चार्ज लेव्हल समजू शकणार आहे. साध्या लाईटनिंग केबलने ही स्मार्टकेस चार्ज करता येणार आहे. या स्मार्टकेसमुळे २५ तासांचा एक्स्ट्रा टाँकटाईम, एलईटीवर १८ तास इंटरनेट ब्राऊजिंग व ऑडिओ व्हिडीओ प्लेबॅक मिळू शकणार आहे.

Leave a Comment