‘इंटेक्स’ने आणला ‘क्लाऊड फ्लॅश ४जी’ स्मार्टफोन

cloud-flash-4g
नवी दिल्ली : आपल्या क्लाऊड श्रेणीतील ‘क्लाऊड फ्लॅश ४जी’ हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन क्षेत्रातील कंपनी ‘इंटेक्स’ने लाँच केला असून ९,९९९ रूपये या फोनची किंमत आहे.

इंटेक्सने डबल डेटा ऑफरसाठी एअरटेलसोबत करार केला असून ही ऑफर ३जीसह ४जी सिमवरही लागू करण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफानेच्या स्क्रिनवर कंपनीने एक वर्षांची वॉरंटी दिली आहे.

इंटेक्स ‘क्लाऊड फ्लॅश ४जी’चे फिचर्स : यात ५.० इंचाचा एचडी सूपर एमोलेड आणि ७२०x१२८० पिक्सल रेझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉईड 5.1 लॉलीपॉप बेस आहे. तर १.३ गीगाहर्ट्ज ऑक्टाकोरचा प्रोसेसर दिला आहे. यात २ जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. त्याचबरोबर याच स्टोअरेज क्षमता १६ जीबीची असून १२८जीबी पर्यंत याची मेमरी वाढवू शकता. यात एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल रियर, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २३०० एमएएच एवढी आहे. त्याचबरोबर यात ३जी, ३जी, वायफाय ८०२.११, ब्ल्यूटय़ूथ, जीपीआरएस/एज अशा कनेक्टीव्हीटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment