हृदय बंद पडूनही जगला आधुनिक ‘सत्यवान’

heart

अहमदाबाद: प्राचीन कथेमध्ये मरण पावलेल्या सत्यवानाला सावित्रीने यमाकडून परत जिवंत करून आणल्याचा उल्लेख आहे. अशाच प्रकाराची चमत्कारिक घटना येथील एका रुग्णालयात घडली. मात्र या घटनेत सावित्रीची जागा घेतली आहे डॉक्टरांनी आणि ‘व्हॉटस अॅप’नेही !
तब्बल
५० मिनिटे हृदयाचे ठोके थांबूनही हृदयरोगाच्या रुग्णाने तग धरली आणि हा रुग्ण ठणठणीत होऊन घरीही परतला. हा वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारच असल्याचे या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
हृदयरोगाने त्रस्त असलेले सानंद येथील एक व्यावसायिक राजेंद्र पटेल (वय ५०) यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे हृदय बंद पडले होते. हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे नवजीवन रुग्णालयाचे डॉ आशिष सक्सेना यांनी ‘सीपीआर’ उपचार पद्धतीनुसार तब्बल १०० वेळा रुग्णाच्या छातीवर दाब दिला आणि विजेचे धक्केही दिले. हे तातडीचे उपचार तब्बल ५० मिनिटे सुरू होती. तोपर्यंत ते कोमात गेले आणि मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांच्या जगण्याच्या आशा मालवत चालल्या होत्या. मात्र हृदय बंद पडूनही पटेल यांनी ही ५० मिनिटे तग धरली हे विशेष! आता तर पटेल हे पूर्ण बरे होऊन आपल्या घरी रवाना झाले आहेत.

हे उपचार सुरू असताना डॉ. सक्सेना हे दूरध्वनी आणि ‘व्हॉटस अॅप’च्या माध्यमातून घुमा येथील कॉर्पोरेट रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ रवी संघवी यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment