सेबीची रत्नाकर बँकेला नोटीस

ratnakar-bank
नवी दिल्ली : रत्नाकर बँकेला बाजार नियंत्रक सेबीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली असून आयपीओच्या माध्यमातून कंपनीने नियमांचे उल्लंघन करत १४५० कोटी रुपये जमा करण्याची योजना तयार केल्याचा सेबीने आरोप केला आहे.

कंपनीने कारणे दाखवा नोटीसीला समाधानकारक उत्तर दिल्यानंतरच आयपीओ आणण्याबाबत परवानगी दिली जाऊ शकते. त्याबरोबरच सेबीने कंपनीवर का कारवाई करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. आरबीएल बँकेने या वर्षी जूनमध्ये आयपीओ आणण्यासाठी सेबीला अर्ज केला होता. बँकेने दिलेल्या माहितीनुसार आयपीओच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या रकमेचा वापर भविष्यात आवश्यक असणा-या निधीची गरज भागविण्यासाठी आणि बेसिल २ व रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

वर्ष २००३ मध्ये रत्नाकर बँकेने १०० रुपयाच्या किमतीवर ९ लाख ५४ हजारचे राईट्स इश्यू जारी केले होते. यामध्ये ४ लाख ७१ हजारचे समभाग सबस्क्रायब झाले होते. तर इतर ४.८३ लाख अनसबस्क्रायब समभाग गुंतवणूकदारांना अलॉट करण्यात आले होते. रत्नाकर बँकेने वर्ष २००६ मध्ये पुन्हा १०० रुपये किमतीचे १९.३८ लाखाचे राइट्स इश्यू जारी केले. यामध्ये ८.१७ लाख समभाग सबस्क्रायब झाले होते. तर इतर ११.२१ लाख समभाग बँकेने गुंतवणूकदारांना अलॉट केले होते.

Leave a Comment