सॅमसंगला महागात पडला पेटंट वाद

petant
नवी दिल्ली : स्मार्टफोन बाजारातील सॅमसंग आणि अॅपल यांच्यातील पेटंट वादावर अखेर पडदा पडला असून सॅमसंगला या वादाचा शेवट चांगलाच महागात पडला आहे. पेटंटवरील वादावरुन या दोन कंपन्यांमधील मोठी न्यायालयीन लढाई झाली. तब्बल ३ हजार ६५३ कोटी रुपये नुकसान भरपाई दक्षिण कोरियाच्या सॅमसंगला अमेरिकन कंपनी अॅपलला पेटंट चोरल्याप्रकरणी द्यावी लागणार आहे.

सप्टेंबर महिन्यात पेटंट वादावरील निर्णय अॅपलच्या बाजूने लागल्याने सॅमसंग कंपनी ३ हजार ६५३ कोटी रुपये दंड देण्यास सहमत झाल्याचे नॉदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन डिस्ट्रिक्ट कोर्टाने संयुक्त जबाबात सांगितले आहे. मात्र, पेटंट वादाप्रकरणी सॅमसंगने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

न्यायालयाच्या आदेशाने आम्ही नाराज असून पेटंटच्या नुकसान भरपाईची रक्कम अॅपलने अव्वाच्या सव्वा सांगितल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. न्यायालयाने पेटंटची वैधता तपासून घेण्याचा प्रयत्नही केला नसल्याचा दावा सॅमसंगने केला आहे.

अॅपलला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पेटंटची वैधता तापसण्याचाही प्रयत्न न करता घेण्यात आला आहे. तरीही आम्हाला विश्वास आहे की, अॅपलच्या पेटंटचे उल्लंघन आमचे प्रॉडक्ट करत नाहीत. आम्ही नेहमी कायदेशीर बाबी तपासूनच प्रॉडक्टला सुरक्षित ठेवत असल्याचे सॅमसंगने म्हटले आहे.

Leave a Comment