लवकरच भारतात लाँच होणार मोतोरोलाचा मोटो G टर्बो !

moto
मुंबई: नुकतेच मोबाइल कंपनी मोटोरोलाने स्मार्टवॉच मोटो ३६० लाँच केले. त्यानंतर आता आपला नवा स्मार्टफोन मोटो G टर्बो भारतात लाँच करण्याच्या तयारीत ही कंपनी आहे.

मोटोरोलाने मोटो G टर्बो भारतात लाँच करण्याचे संकेत आपल्या ट्विटर अकांउटवरुन दिले असून हा स्मार्टफोन मागील महिन्यात मेक्सिकोमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास १८,६०० असू शकते. तसेच भारतीय बाजारपेठेत याची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

काय आहेत मोटो G टर्बोचे फीचर: या फोनमध्ये ५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले असून त्याचे रेझ्युलेशन १०८०×१९२० पिक्सलचे आहे. हा फोन ड्युल सिम सपोर्ट असून यात ६४ बिट ऑक्टा-कोअर, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५चा प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये २ जीबीचे रॅम, त्याचबरोबर १६ जीबीची इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता २४७० mAh एवढी आहे.

Leave a Comment