जीमेल घेणार निरोप?

inbox
गुगलची युजरच्या अंगवळणी पडलेली जीमेल सेवा लवकरच युजरचा निरोप घेत असल्याचे संकेत गुगलकडून दिले जात आहेत. कंपनीने युजरना इनबॉक्स इन, जीमेल आउट संदर्भात नोटिफिकेशन देणे सुरू केले असून नवीन सेवेने युजरची जीमेल अकौंट रिप्लेस केली जात असल्याची माहितीही दिली आहे.

फोर्ब्सच्या बातमीनुसार इनबॉक्स वापरणार्‍या युजरना लॉग इन केल्यावर धन्यवाद देणारा मेसेज येत आहे. जीमेलपेक्षाही अधिक सुलभ सेवेकडे तुम्हाला रिडायरेक्ट केले गेले असल्याचेही कळविले जात आहे. अर्थात ज्यांना नको असेल ते युजर टर्नऑफ करू शकणार आहेत. गुगलने २०१४ मध्येच इनबॉक्स ही सेवा लाँच केली होती. त्याचा उद्देश युजरला त्याची ईमेल योग्य प्रकारे ऑरगनाईज करण्यासाठी होणार आहे. यामुळे आपल्या अपॉईंटमेंटस, फ्लाईट बुकींग्ज, पॅकेज डिलिव्हरीची माहितीही स्क्रीनवरच युजरला मिळणे शक्य झाले आहे. ही सेवा घेण्यासाठी कांही निवडक युजरना गुगलने आमंत्रित केले होते.

ही सेवा स्मार्टफोन, वेब, आयफोन वरही रियल टाईम अपडेटस दाखविते. ऑनलाईन खरेदीच्या डिलीव्हरी स्टेटसची माहितीही यावर मिळू शकते आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात जीमेलची जागा इनबॉक्स घेईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment