जगातील सर्वोत्कृष्ट दहा अंडरवॉटर हॉटेल्स

[nextpage title=”जगातील सर्वोत्कृष्ट दहा अंडरवॉटर हॉटेल्स”]
collarge
हिंदू मिथॉलॉजीमध्ये भगवान विष्णू हे समुद्राच्या तळाशी शेष नागावर विश्रांती घेतात असा समज आहे. समुद्राच्या तळाशीकिंकिवा पाण्यात राहण्याचा अथवा विश्रांती घेण्याचा, मौज मजा करण्याचा अनुभव आपण कसा घेऊ शकणार असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर तयार आहे. बांधकाम क्षेत्रातील क्रांती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा महिमा आहे. जगात अनेक देशांत समुद्रात पाण्याखाली अत्याधुनिक आरामदायी हॉटेल्स बांधली गेली आहेत. तेथे तुम्ही समुद्राखालची रंगीबेरंगी दुनिया सुरक्षितपणे न्याहाळतानाच जेवणाचा, राहण्याचा आनंद घेऊ शकता आणि त्यातील थ्रिल अनुभवू शकता. अशाच टॉप टेन हॉटेलची ही माहिती .

१) अॅटलांटिस हॉटेल
1-Atlantis
दुबईतील हे प्रसिद्ध हॉटेल. येथे येऊन तुम्हाला आवश्यक आराम मिळेल आणि पाण्याखालची दुनिया न्याहाळताही येईल. मुले इकडेतिकडे बागडत असताना तुम्ही कोणताही डिस्टर्ब नसलेल्या खोलीत आराम करू शकता आणि खिडकीचा नुसता पडदा सारलात की समुद्रातील रंगीबेरंगी जीव तुम्हाला त्यांच्या नयनमनोहर क्रिडांनी खुलवायला हजर असलेले दिसतील.[nextpage title=”२) ज्युल अंडर सी लॉज”]

2-Jules-Undersea-Lodge
येथे जायचे तर तुम्हाला साहसाची थोडी तरी आवड हवी. फ्लोरिडातील के लार्गो किनार्‍यावर असलेले हे लॉज वाचनप्रेमींसाठी स्वर्ग आहे. कारण त्याचे नावच मुळी ट्वेंटी थाऊजंड लिग्ज अंडर द सी लिहिणारया ज्यूल्स वर्ने या लेखकावरून ठेवले गेले आहे. येथे प्रवेश करण्यासाठी स्कूबा डायव्हिंगचा अनुभव त्याचे प्रशिक्षण घेतले असल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागते. २१ फूट खोल पाण्यात असलेले हे लॉज जगातील सर्वात जुने अंडरवॉटर केंद्र आहे. मुळात हे संशोधन केंद्र होते त्याचे आता लॉज केले गेले आहे.[nextpage title=”३)मंटा रिसॉर्ट”]

3-The-Manta-Resort
प्रवासासाठी कधी झांझिबारला जायचा विचार तुम्ही केला आहे काय? असेल तर मग मंटा रिसॉर्टला भेट द्यायला विसरू नका. येथे अगदी खास म्हणाव्यात अशा अंडरवॉटर रू म्स आहेत. कधीही पाहिला नसेल असा स्वच्छ पाण्याचा समुद्र आणि या नितळ पाण्यात दिसणारे शेकडो प्रकारचे समुद्री जीव तुमचा हा मुक्काम संस्मरणीय करतील.[nextpage title=”४) द अटर इन”]

4-The-Utter-Inn
स्वीडन मध्ये उभारले गेलेले हे इन आर्टिस्ट मायकेल जेनबर्गची निर्मिती आहे. हे केवळ एकच बेडरूम असलेले इन ग्राहकाला लेक मलारेनमधील या अंडरवॉटर जागेत शांत झोपेचा अनुभव देण्यास समर्थ आहे. वरून ही जागा बोटीच्या डेकसारखी दिसते. मात्र खालची खोली एकांत आणि शांतता म्हणजे काय याचा पुरेपुर अनुभव देते. येथे गेलात की आजवर कधीही पाहिले नसतील असे मासेही दर्शन देतात.[nextpage title=”५)कॉन रॅड मालदीवज-रंगाली”]

5-Conrad-Maldives-Rangali-I
निसर्गसुंदर मालदीव्ज मधल्या रंगाली बेटावरचे हे हॉटेल ज्यांना पाण्याखाली कसे वाटते याचा थोडाच अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आदर्श ठिकाण आहे. हे हॉटेल अंडरवॉटर नाही तर त्याची डायनिग रूम फक्त अंडरवॉटर आहे. म्हणजे एकाच वेळी जमिनीवर आणि पाण्याखाली असण्याचा अनोखा अनुभव येथे घेता येतो.[nextpage title=”६)हायड्रोपोलिस”]

6-Hydropolis
दुबईतील हे हॉटेल आधुनिक तंत्रज्ञानाने केल्या जात असलेल्या बांधकामाचा आणि अत्याधुनिक सेवा सुविधांचा जिताजागता अनुभव देणारे आहे. हे हॉटेल अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाही. मात्र येथील खोल्यांमधून गल्फचा मस्त नजारा पाहता येतो.[nextpage title=”७)सबसिक्स-नियामा”]

7-Subsix-at-Niyama
हिंदी महासागरात पाण्याखाली असलेला हा क्लब आहे. क्लबमध्ये जी मौजमस्ती चालते म्हणजे, ड्रिंक्स, डान्स ती सर्व येथेही चालू असते. रात्रभर एन्जॉय करताना एका गोष्टीचे भान ठेवायचे ते म्हणजे तुम्ही जे कांही करताय त्यावर कोणाची तरी नजर आहे. घाबरू नका ही नजर ठेवणारे दुसरेतिसरे कोणी नाहीत बरं का! तर ते आहेत हिंद महासागराचे कायमचे रहिवासी असलेले अनेक प्रकारचे मासे, कासवे व अन्य समुद्री प्राणी.[nextpage title=”८)पॉसिडॉन अंडर सी रिसॉर्ट”]

8-Poseidon-Undersea-Resort
फिजी बेटांतील हे रिसॉर्ट म्हणजे अंडरवॉटर चॅपलच आहे. म्हणजे तुम्हाला लग्नविधी येथे करायचे असतील तर ते करता येतात. त्यासाठी पार्श्वभूमीवर नयनमनोहर कोरल गार्डन आहे. म्हणजे लग्नाचे फोटो काय सुंदर येत असतील ना? हे रिसॉर्ट कुठल्याही प्रकारच्या प्रवाशांसाठी आदर्श आहे. साहसप्रेमींसाठी स्कूबा सबमरीन ऑप्शन आहे तसेच आराम हवा असणार्‍यांसाठी स्पाही आहे.[nextpage title=”९) लाईम स्पा”]

9-Lime-Spa
मालदिवमधला हा स्पॉट ज्यांना शांतपणा हवाय त्यांच्यासाठी अगदी योग्य म्हणावा लागेल. येथे एकांताचा पुरेपूर अनुभव घेता येतो तसेच रिलॅक्स होण्यासाठी स्पा सेवा घेता येते.[nextpage title=”१०) लव्हर्स डीप”]

10-Lovers-Deep
हे हॉटेल अंडरवॉटर हॉटेलमधले युनिक डेस्टीनेशन म्हणता येईल. नावावरूनच लक्षात येते की प्रेमी युगुलांसाठी ते खास आहे. एकमेकांच्या सहवासाचा पुरेपूर आनंद लुटताना भोवतीच्या कॅरेबियन स्थलदर्शनाचा आनंदही येथे घेता येतो. कारण ही एक पाणबुडीच आहे. त्यामुळे ती एका ठिकाणाहून दुसरी कडे जाऊ शकते. प्रेमींसाठीचे हे रोमँटिक गेटवेच जणू. जगापासून दूर जायचेय आणि एकांतात एकमेकांच्या सहवासात राहायचेय तर या ऑप्शनचा जरूर विचार करा.

Leave a Comment